scorecardresearch

Premium

फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावीपणे राबवलेल्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या मोहिमांमुळे भारताला शंभर पदके मिळवण्याची कामगिरी करता आली, असे प्रधान म्हणाले.

union minister dharmendra pradhan in pune, india won 100 medals due to fit india, fit india and khelo india
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य (संग्रहित छायाचित्र)

पुणे : आशियाई स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच शंभर पदके मिळवण्याची कामगिरी केली. भारताच्या या कामगिरीवर केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावीपणे राबवलेल्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या मोहिमांमुळे भारताला शंभर पदके मिळवण्याची कामगिरी करता आली, असे प्रधान म्हणाले.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या २९ व्या पदवीप्रदान कार्यक्रमानंतर प्रधान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चीनमध्ये आशियाई स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील भारताच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून पहिल्यांदाच शंभर पदकांचा टप्पा गाठला.

First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
Bihar special status
पक्षाला जनतेत पोहोचवण्यासाठी नितीश कुमारांची धडपड; एनडीएप्रवेशानंतरही बिहारसाठी ‘विशेष दर्जा’ची मागणी
Congress government in Telangana
तेलंगणात काँग्रेसचे ‘मिशन लोकसभा’, लोकांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा पाऊस!

हेही वाचा : गुणवत्तापूर्ण आर्थिक विकास हे देशापुढील आव्हान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मत

प्रधान म्हणाले, की भारताच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी फार मोठी आणि महत्त्वाची आहे. पहिल्यांदाच भारताने शंभर पदके मिळवली आहेत. आतापर्यंत सर्वाधिक सत्तर पदकेच मिळवली होती. आता खेळाडूंनी सर्वच खेळांमध्ये उत्तम कामगिरी करून पदके प्राप्त केली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune union minister dharmendra pradhan says india won 100 medals in asian games 2023 due to fit india and khelo india pune print news ccp 14 css

First published on: 07-10-2023 at 13:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×