T20I Tri Series Final: वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरु असून त्यात या महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी तिथे पोहचल्या आहेत. मात्र त्याआधी टीम इंडियाने सराव व्हावा या दृष्टीकोनातून तिरंगी मालिकेत खेळली. त्यात भारतीय महिला संघाने चांगले प्रदर्शन करत तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली मात्र यजमान दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेची आज अंतिम फेरी होती याकडे सर्वजण आगामी टी२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहत होते त्यात हरमनब्रिगेड अपयशी ठरली. या मालिकेत भारत, दक्षिण आफ्रिका  या दोन संघांव्यतिरिक्त वेस्ट इंडीजचा संघ देखील सामील होता.

धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ७ धावांत त्यांची पहिली विकेट पडली. तर अवघ्या २१ धावात त्यांनी ३ गडी गमावले. मात्र त्यानंतर आलेल्या क्लो ट्रायॉनने ३२ चेंडूत अर्धशतक करत आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून दिला. नदीन डी क्लार्क १७ चेंडूत १७ धावा करून चांगली साथ दिली. कर्णधार सून लूसने १३ चेंडूत १२ धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर दिप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करत तिला साथ दिली मात्र ती अपुरी ठरली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या क्लो ट्रायॉनला सामनावीर तर दिप्ती गायकवाडला मालिकाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Mumbai Chennai Gujarat Bangalore and Delhi attention to the performance of these teams in IPL
विश्लेषण : मुंबई, चेन्नई सहाव्यांदा, की बंगळूरु पहिल्यांदा… आयपीएलमध्ये यंदा कोणाची सरशी?
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

बफेलो पार्क इस्ट लंडन येथे खेळला गेलेल्या सामन्यात भारतीय संघान हरलीन देओलच्या ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर ४बाद १०९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसमोर ११० धावांच लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात फारशी काही चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मंधानाच्या (०) रुपाने पहिला धक्का बसला. तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या केवळ १ होती. त्याचनंतर पाठोपाठ यष्टीरक्षक जेमिमाह रॉड्रिग्जदेखील (११) लवकर बाद झाली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला.

मध्यक्रमात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओलने संघाचा डाव सावरला. या दोन फलंदाजांनी तिसऱ्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरमनप्रीत कौर २१(२२) धावांवर बाद झाली. भारतीय संघाकडून हरलीन देओल सर्वाधिक धावा केल्या. तिने ५६ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. मात्र त्या भारतीय संघाला विजयी करण्यासाठी अपुऱ्या पडल्या. १० फेब्रुवारीपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताला आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.