पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : भावना, सोनल पराभूत

महिलांच्या तिसऱ्या विभागाच्या स्पर्धेत सोनलने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लिकुआनपेक्षा सरस खेळ केला.

टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय अभियानाची सुरुवात बुधवारी टेबल टेनिसपटूंच्या पराभवाने झाली. भावना पटेल आणि सोनल पटेल यांचे सलामीच्या लढतीतच पराभव झाले.

महिलांच्या तिसऱ्या विभागाच्या स्पर्धेत सोनलने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लिकुआनपेक्षा सरस खेळ केला. परंतु नंतर हा सामना ११-९, ३-११, १७-१५, ७-११, ४-११ अशा फरकाने गमावला. चौथ्या विभागातील अन्य लढतीत, भावनाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या चीनच्या झोऊ यिंगला उत्तम टक्कर दिली. पण तिने या सामन्यात ३-११, ९-११, २-११ अशी हार पत्करली.

दरम्यान, स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ऑस्ट्रेलियाच्या पेगी ग्रीकोने सायकलिंगमध्ये मिळवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In the spirit of the paralympic games sonal lost akp