भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर १६८ धावांनी मात करताना ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम २० षटकात ४ गडी गमावून शुबमनच्या (१२६*) शतकाच्या जोरावर २३४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंड २३५ धावांचे लक्ष्ये दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १२.१ षटकांत ६६ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने २-१अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव करताना एक मोठा विक्रम केला आहे. टीम इंडियाचा टी-२० इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्याने आयर्लंडचा १४८ धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानने त्याचा १०३ धावांनी पराभव केला होता.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
IPL 2024 CSK vs RCB Match Updates in Marathi
CSK vs RCB : विराट कोहली चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास, पहिली धाव घेताच करणार खास विक्रमाची नोंद

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १२.१ षटकांत ६६ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २५ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावांचे योगदान. या दोघां व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणे सेपे झाले.

तत्पुर्वी या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इशान किशनच्या रूपाने भारताला सुरुवातीचा पहिला धक्का बसला, मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पॉवरप्लेमध्ये दमदार खेळ दाखवला. पॉवरप्लेमध्ये भारताने १ गडी गमावून ५८ धावा केल्या होत्या. राहुल त्रिपाठी ४४ (२२) धावांची धडाकेबाज खेळी खेळून बाद झाला. सूर्यानेही वेगवान खेळी खेळली.

त्याच वेळी, शुबमन गिलने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने शुबमन गिलच्या (६३ चेंडूत नाबाद १२६) झंझावाती शतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. शुबमन गिलने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या. त्याने ६३ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.०० होता. गिलच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर आता टी-२० मध्येही शतक झळकावले आहे.