आशियाई स्पर्धेसाठी आलेल्या सात अ‍ॅथलिट्सनी परवानगी न घेताच क्रीडाग्राम सोडून दक्षिण कोरियात काम शोधण्यासाठी धडपड केली असून त्या सात अ‍ॅथलिट्सचा पोलीस आता शोध घेत आहेत. या अ‍ॅथलिट्समध्ये नेपाळच्या तीन, श्रीलंकेच्या दोन आणि बांगलादेश व पॅलेस्टाइनच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
‘‘दक्षिण कोरियात काम करत असलेल्या या देशातील लोकांकडून आम्ही या हरवलेल्या अ‍ॅथलिट्सचा शोध घेत आहोत. या अ‍ॅथलिट्सचा शोध घेतल्यानंतर आम्ही त्यांना १९ ऑक्टोबर रोजी व्हिसा संपण्याच्या आधी हा देश सोडून जाण्यास सांगणार आहोत,’’ असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सिऊल, इन्चॉन, बुचॉन आणि अन्सान या दक्षिण कोरियातील शहरांमध्ये आशियामधील अनेक देशांमधील लोक काम करत आहेत.