रिओ डी जानेरो : कतार येथे होणाऱ्या आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलच्या संघात नेयमारसह नऊ आघाडीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षक टेटे यांनी ३९ वर्षीय बचावपटू डॅनी आल्वेसलाही २६ सदस्यीय संघात स्थान दिले आहे. पाच वेळा विश्वविजेत्या ब्राझीलच्या संघाला यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाते आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ब्राझीलची भिस्त तारांकित आघाडीपटू नेयमारवर असेल. यंदाच्या ‘फिफा’ विश्वचषकासाठी ब्राझीलचा ग-गटात समावेश असून त्यांचे सर्बिया, स्वित्र्झलड आणि कॅमेरून यांच्याशी साखळी सामने होतील.

  • गोलरक्षक : अ‍ॅलिसन, एडरसन, वेव्हर्टन.
  • बचावपटू : डॅनिलो, डॅनी आल्वेस, अ‍ॅलेक्स सँड्रो, अ‍ॅलेक्स टेलेस, थियागो सिल्वा, मार्किनियोस, एडर मिलिटो, ब्रेमर.

मध्यरक्षक : कॅसेमिरो, फाबिनियो, ब्रुनो गुमेरेस, फ्रेड, लुकास पॅकेटा, एव्हर्टन रिबेरो.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
gujarat giants
WPL 2024 : गुजरात जायंट संघाला मिळालीय ‘ही’ विशेष परवानगी; जाणून घ्या कारण…
Selection of two players from the police disha program for the national football tournament Pune news
गुन्हेगारी मार्गावर भरकटलेल्या मुलांना मिळाली ‘दिशा’; पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
  • आघाडीपटू : नेयमार, व्हिनिसियस ज्युनियर, गॅब्रिएल जेसूस, अँटोनी, राफिन्हा, रिचार्लिसन, मार्टिनेली, रॉड्रिगो, प्रेडो.

ऑस्ट्रेलिया संघात १८ वर्षीय कुओलला संधी

ब्रिस्बेन : आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात १८ वर्षीय गॅरंग कुओलला स्थान मिळाले आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या २६ सदस्यीय संघातून ऑस्ट्रेलियाने अनुभवी गोलरक्षक मिच लँगेरकला मात्र वगळले आहे. गोलरक्षक मॅट रायन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असेल.