नेदरलँड्सविरूद्ध आवश्यक सराव करत भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या शेवटच्या गटवार लढतीतही विजय साकारला. अर्धशतकवीर शिवम दुबे या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र याही लढतीत भारतीय संघाचे काही कच्चे दुवे उघड झाले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात २० षटकांत नेदरलँड्सने १७६ धावा केल्या. पण फिरकीविरूद्ध खेळताना भारताचे काही फलंदाज काही प्रमाणात स्ट्रगल करताना दिसले. तर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला.
भारताने दिलेल्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सने सावध सुरूवात केली. पण जगातील नंबर वन गोलंदाज असलेल्या वरूण चक्रवर्तीने येताच संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. मायकेल लेविटने २४ धावा, तर मॅक्स ओडाऊडने २० धावा केल्या. बास डे लीडे यांनी ३३ धावा व कॉलीन एकरमन २३ धावांचं योगदान दिलं. तर स्कॉट एडवर्ड्सने १५ धावा केल्या. तर झॅक लायन-कॅशेटने २६ धावा तर नोहा क्रोसने २५ धावांचं योगदान दिलं. तर भारताकडून गोलंदाजीत वरूण चक्रवर्तीने ३ विकेट्स, शिवम दुबे २ विकेट्स तर बुमराहने १ विकेट घेतली.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सुपर-८ सामना याच मैदानावर होणार असल्याने टीम इंडियासाठी हा सराव सामना होता. टीम इंडियाची फलंदाजीला सुरूवात फारशी चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद होत माघाी परतला. तर इशान किशनदेखील विचित्र पद्धतीने बाद झाला. आर्यन दत्तचा चेंडू त्याच्या पॅडला लागून मागे पडला आणि विकेटवर आदळला. यासह आर्यन दत्तने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना पॉवरप्लेमध्ये माघारी धाडलं.
सूर्या व तिलक यांनी संघाचा डाव सावरला, पण हे दोघेही अनुक्रमे ३४ व ३१ धावा करत बाद झाले. यानंतर शिवम दुबे व हार्दिक पंड्या यांनी ७४ धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने षटकारांची आतिषबाजी करत महत्त्वाची खेळी केली. शिवम दुबेने ३१ चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावा केल्या. तर हार्दिकने २१ चेंडूत ३ षटकारांसह ३० धावा केल्या. तर रिंकूने अखेरच्या षटकात एक षटकार खेचला. यासह भारतान १९३ धावा केल्या.
