India Beat Pakistan by 58 runs: भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा सुपर सिक्स गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानविरूद्ध सामना संपण्यापूर्वीच भारतीय संघाने सेमीफायनल गाठली होती. आता पाकिस्तानविरूद्ध सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाविरूद्ध खेळणार हेदेखील निश्चित झालं आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावा केल्या. यानंतर पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये जागा मिळवायची होती तर संघाला भारताने दिलेलं २५३ धावांचं लक्ष्य ३३.३ षटकांत म्हणजेत १९० चेंडूत गाठायचं होतं, पण पाकिस्तान संघ ३३.३ षटकांत फक्त १६५ धावा करू शकला आणि परिणामी भारताने सेमीफायनल गाठली. भारताचा नेट रन रेट उत्तम असल्याने टीम इंडियाला सेमीफायनल गाठणं सोपं पडलं.
भारत कोणत्या संघाविरूद्ध खेळणार अंडर-१९ वर्ल्डकप सेमीफायनल सामना?
पाकिस्तानच्या संघाने भारताने दिलेल्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची सुरूवात खूप चांगली केली. उस्मान खान खेळेपर्यंत पाकिस्तानचा संघ भारताला पराभूत करतो की काय असं चित्र असताना टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी पुन्हा एकदा टीम इंडियाला सामन्यात परत आणलं. यासह भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध अंडर-१९ विश्वचषकातील सेमीफायनल सामना खेळणार आहे.
पाकिस्तानच्या संघाने भारताने दिलेल्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची सुरूवात खूप चांगली केली. उस्मान खान खेळेपर्यंत पाकिस्तानचा संघ भारताला पराभूत करतो की काय असं चित्र असताना टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी पुन्हा एकदा टीम इंडियाला सामन्यात परत आणलं. हमजा जहूर व समीर मिन्हास यांनी संघाला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. हेनिल पटेलने समीर मिन्हासल ९ धावांवर बाद केलं. पण नंतर हमजा व उस्मान यांनी फटकेबाजी करत ६५ धावांची भागीदारी रचली. हमजा बाद झाल्यानंतर फरहान व उस्मान यांनी ६३ धावांची भागीदारी रचली. पण संघाला विजयापर्यंत नेलं.
उस्मान खानने ९२ चेंडूत ७ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. तर कर्णधार फरहान ३८ धावा करत बाद झाला. यानंतर आयुष म्हात्रे गोलंदाजीला आला आणि त्याने ३ विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव उडवून लावला. उस्मान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. भारताकडून खिलान पटेल व आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर अंबरीश, हेनिल, कनिष्क व विहान मल्होत्रा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. भारताची सुरूवात चांगली झाली पण संघाने सलग ३ विकेट्स गमावल्या. आरोन जॉर्ज १६ धावा तर वैभव सूर्यवंशी ३० धावा करत बाद झाले. यानंतर वेदांत त्रिवेदीने ६८ धावांची खेळी करत विहान मल्होत्राच्या जोडीने संघाचा डाव सावरला. त्यानंतर अंबरीशने २९ धावा तर अभिज्ञान कुंडूने १६ धावांचं योगदान दिलं. तर कनिष्क चौहानने खालच्या फळीत २९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३५ धावांची खेळी केली. तर खिलान पटेलने २१ धावांचं योगदान दिलं. यासह भारतीय संघाने ४९.५ षटकांत २५२ धावा केल्या.

