Asian Games 2026 IND vs AFG Quarter Final Washout Report: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरूष क्रिकेटमध्ये सामन्यांमध्ये भारत आणि अफगाणिस्तान भिडणार होते. पण निशिन येथे होत असलेला हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. नाणेफेक न होताच सामना रद्द करण्यात आला. भारत-अफगाणिस्तान तसचे हाँगकाँग चीन-पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द झाला आहे. सामना न खेळवता रद्द झाल्याने सेमीफायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळालं आहे, जाणून घेऊया.

सामना रद्द झाल्यानंतर कोणता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला?

क्रिकेटमध्ये पावसामुळे सामने रद्द होऊन गुण दोन्ही संघांमध्ये विभागले जाणं ही सामान्य बाब आहे; मात्र, बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांमध्ये निकालाची आवश्यकता असते. याच कारणामुळे, रँकिंगच्या आधारे भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. सध्याच्या आयसीसी (ICC) रँकिंगनुसार, भारत हा जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० संघ आहे, तर अफगाणिस्तान १०व्या स्थानावर आहे.

याआधी, भारत वगळता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांना उपांत्यपूर्व फेरीत जे मुळात बाद फेरीचे सामने होते थेट प्रवेश मिळाला होता; तर हाँगकाँग, जपान, अफगाणिस्तान, मलेशिया आणि ओमान यांच्यात गट-स्तरीय सामने खेळले गेले.

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीचा सामना १ ऑक्टोबरला होणार आहे. पण भारताचा सामना कोणत्या संघाविरूद्ध होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना हाँगकाँग चीन व पाकिस्तान यांच्यात होणार होता, हा सामनादेखील पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. याशिवाय उपांत्य फेरीतील अजून दोन संघ निश्चित होणं बाकी आहे. तिसरा उपांत्यपूर्व सामना नेपाळ व श्रीलंका यांच्यात तर चौथा उपांत्यपूर्व सामना बांगलादेश व मलेशिया यांच्यात होईल. या दोन्ही सामन्यांचे विजेते संघ उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान संघांविरूद्ध भिडतील.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वैभव सूर्यवंशी, विप्रज निगम, यश ठाकूर