India vs Afghanistan T20 Series, Rohit Sharma: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणतो की, २०२४च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या नसून रोहित शर्मा असेल. त्याने आपल्या दाव्यामागे हार्दिक पंड्याचा फिटनेस हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि आता तो थेट आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे, त्यामुळे तो कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “कदाचित हार्दिक टी-२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधार नसणार कारण, त्याची फिटनेसची समस्या खूप मोठी आहे. तो सध्या क्रिकेट खेळत नाही. विश्वचषकात त्याचा पाय मुरगळल्याने घोट्याला सूज आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो एनसीए मध्ये सराव करत असून त्याच्या तंदुरुस्तीवर भर देत आहे. तो अफगाणिस्तान मालिका खेळणार नाही आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकाही खेळणार नाही. आता तो थेट आयपीएल खेळणार असल्याने ही गोष्ट त्याच्या विरोधात गेली आहे.”

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

हेही वाचा: IND vs ENG: “निवडकर्त्यांना जे वाटते त्याचा परिणाम…” मोहम्मद कैफने चेतेश्वर पुजाराबाबत केले सूचक विधान

माजी सलामीवीर पुढे म्हणतो की, “मला वाटते की फक्त रोहितच टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळेल. २०२४च्या टी-२० विश्वचषकातही तो भारताचा कर्णधार असेल. जर तुम्ही हा प्रश्न २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विचारला असता तर त्याचे उत्तर नक्कीच असे असेल की पुढील टी-२० विश्वचषकात तो कर्णधार नसेल कारण, ज्या प्रकारे टीम इंडियाने त्यावेळी १० षटकात ६० धावा केल्या होत्या. एकदिवसीय विश्वचषक रोहितसाठी मोठी संजीवनी ठरला आहे. आता परिस्थिती बदलली असून आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार असू शकतो.”

रोहित शर्मा प्रदीर्घ कालावधीनंतर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार!

यावर्षी, टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा आयपीएलनंतर म्हणजेच १ जूनपासून सुरू होईल. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाकडे फक्त एक टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका शिल्लक आहे. ही मालिका याच महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळवली जाणार आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा टी-२० संघ आज (७ जानेवारी) जाहीर केला. या मालिकेतून रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार, असे मानले जात आहे.

हेही वाचा: पीसीबीचा मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूला केले पाकिस्तान टी-२० संघाचा उपकर्णधार, काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. , आवेश खान, मुकेश कुमार.