Team India Playing XI Prediction: आयपीएल २०२६ स्पर्धा समाप्त झाली आहे. सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. तर अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले खेळाडू लवकरच पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा कसोटी सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यासाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी या सामन्यासाठी संभावित प्लेईंग ११ निवडली आहे.
अनिल कुंबळे यांच्या मते, अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी प्रसिध कृष्णाला विश्रांती द्यायला हवी, तर गुरनूर ब्रारला पदार्पण करण्याची संधी मिळायला हवी. या मालिकेसाठी गुरनूर ब्रारसह मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. यासह त्यांनी २ फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात यावी असं म्हटलं आहे. कुंबळेंच्या मते, हर्ष दुबे आणि कुलदीप यादव या जोडीला संधी दिली गेली पाहिजे.
अनिल कुंबळे म्हणाले, “या सामन्यात २ फिरकीपटू नक्कीच खेळतील. पहिला कुलदीप यादव आणि दुसरा हर्ष दुबे. कुलदीप आधीच संघात आहे, त्यामुळे तुम्हाला त्याला संघात स्थान द्यावच लागेल. म्हणजे कुलदीप आणि हर्ष दुबे हे दोघेही फिरकीपटू म्हणून खेळतील. मला असं वाटतं, नितीश कुमार रेड्डीलाही संधी दिली जाऊ शकते. पण खरी अडचण अशी आहे की, तो चौथा गोलंदाज म्हणून खेळत आला आहे, पण कर्णधार त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.” नितीश रेड्डीला बऱ्याचदा संघात स्थान दिलं गेलं, पण त्याला गोलंदाजी खूप वेळेस दिली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, “वॉशिंग्टन सुंदर देखील आहे. मी ध्रुव जुरेलच्या आधी वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य दिलं आहे. मी त्याच्याकडे एक फलंदाज म्हणून पाहतो. जर तुमची त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची तयारी असेल, तर तो फलंदाज म्हणून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी नक्कीच सक्षम असायला हवा.”
या सामन्यासाठी अशी आहे अनिल कुंबळे यांनी निवडलेली संभावित प्लेईंग ११:
देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार) साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
