Ind vs Aus : भारताचा ‘गब्बर’ झाला एक हजारी मनसबदार

पहिल्या वन-डेत शिखरने सावरला संघाचा डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने सावध सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सार्थ ठरवला, सलामीवीर हिटमॅन अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवनने लोकेश राहुलच्या साथीने संघाचा डाव सावरला.

यादरम्यान शिखरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यात १ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा शिखर धवन पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी असा कारनामा करुन दाखवला आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : छोटेखानी खेळीत गब्बर-हिटमॅनची जोडी चमकली, मानाच्या यादीत स्थान

रोहित शर्मा – शिखर धवन जोडी भारताला भक्कम सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली असली तरीही या जोडीने एक विक्रम आपल्या नावे जमा केला. एखाद्या संघाविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या जोडीत रोहित-शिखर धवन ही जोडी दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. दरम्यान, २०२० वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी वन-डे सामन्यांची मालिका ही भारतीय संघासमोरचं पहिलं मोठं आव्हान असणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. त्यामुळे भारतीय संघ आता कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ind vs aus 1st odi shikhar dhawan becomes 5th indian batsman to complete 1 k runs against australia psd