scorecardresearch

IND vs AUS Test Series: पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाचा भारतावर गंभीर आरोप; म्हणाले, ”फोटोंनीच भारताचा डाव…”

Border Gavaskar Trophy: बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्याआधीच नागपूरच्या खेळपट्ट्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

IND vs AUS 1st Test Australian media has made serious allegations
नागपूरची खेळपट्टी (फोटो-ट्विटर)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. नागपुरात पहिला कसोटी सामना खेळणार असून त्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे, यापूर्वी माजी खेळाडू खेळपट्टीबाबत वक्तव्य करत होते. आता ऑस्ट्रेलियन मीडियानेही भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

भारतातील खेळपट्ट्यांवर अनेकदा चेंडू वळताना दिसतो, त्यामुळेच बाहेरून येणाऱ्या संघांना येथे विजय मिळवणे कठीण असते. यावेळीही तेच घडण्याची अपेक्षा आहे. कारण ऑस्ट्रेलियाला फिरकीची भीती वाटत आहे. ऑस्ट्रेलियाला गेल्या दोन दशकांपासून भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नसल्याने ही भीतीही दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलियन मीडिया फॉक्स क्रिकेटने नागपूर कसोटी सामन्याच्या खेळपट्टीचा, फोटो शेअर करताना एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये म्हणले की, ”इथे काय चालले आहे? ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी खेळपट्टीची चिंता वाटत असल्याने, फोटोंनी विचित्र भारताचा डाव उघड केला आहे.”

आता ऑस्ट्रेलियन मीडियाने खेळपट्टीबाबत भारतावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर कसोटीत ज्या खेळपट्टीचा वापर होणार आहे, त्याचे फोटो आता समोर येऊ लागली आहेत. दोन दिवसांपूर्वीपर्यंत खेळपट्टीवर गवत दिसत होते, त्यानंतर ऑस्ट्रेलिया शांत झाला होता. पण खेळपट्टीवरील गवत काढून सामन्याच्या आधी रोलर फिरल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली.

हेही वाचा – Turkey Earthquake: धक्कादायक…! टर्कीचा गोलकीपर अहमत इयुप तुर्कस्लानचा मृत्यू

केवळ ऑस्ट्रेलियन मीडियाच नाही तर सध्याचे आणि माजी खेळाडूही खेळपट्टीबाबत वातावरण निर्माण करण्यात गुंतले आहेत. भारताने मालिकेत योग्य खेळपट्टी दिली तर ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो, असे विधान इयान हिली यांनी केले. पण खेळपट्टीत त्रुटी राहिल्यास मालिकेबाबत काही सांगता येणार नाही. इयान हिली व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ आणि इतर काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही अशीच विधाने केली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 14:45 IST
ताज्या बातम्या