टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक पहिल्यांदाच कसोटी सामन्यात कॉमेंट्री करताना दिसणार आहे. ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी डीके बुधवारी नागपुरात पोहोचला. विमानतळावर उतरल्यावर तो जड सामानासह दिसला. त्याच्यासोबत चार मोठ्या बॅगा होत्या. विमानतळावर पोहोचल्यानंतर डीकेने एक फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांना एक प्रश्न विचारला. ज्यामुळे चाहत्यांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली.

दिनेश कार्तिकने नागपूरला पोहोचताच एक ट्विट केले. ज्यामध्ये फोटो पोस्ट करताना त्याने लिहले, ”मी नागपूरला पोहोचलो आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धा सुरू होणार आहे. मी म्हणू शकतो की जास्त सामान नाही. तुम्हा सर्वांना काय वाटते?” यावर नेटकरी खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामुळे दिनेश कार्तिकची चांगलीच फजिती होत आहे.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

चाहत्यांनी घेतली डीकेची खूपच मजा –

डीकेने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा महापूर आला. अनेक चाहत्यांनी त्याचा मनसोक्त आनंद लुटला. एक चाहता अमनदीप सिंह या यूजरने लिहिले, ‘भावा वहिनीने तुला घरातून हाकलून दिले का? ज्यामुळे तू सर्व सामान पॅक केले आहेस.

दिवाकर मिश्रा म्हणाला, ‘संपूर्ण कॉमेंट्री टीमसाठी हे पुरेसे आहे.’ त्याच वेळी, सौरभ श्रीवास्तवचा एक चाहता म्हणाला, ‘तुम्ही जास्तीत जास्त चार दिवस तिथे राहाल. कारण पाचव्या दिवसापर्यंत कसोटी खेळली जात नाही. ब्रॉडकास्टर तुमची बिले भरतात असे दिसते, मग सामान शुल्काची काळजी का करू नये.’

प्रशांत भारद्वाज या युजरने लिहिले, ‘भाऊ, ४-५ महिन्यांचा कार्यक्रम आहे का?’

नागपुरात आपली ताकद दाखवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज –

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर बहुप्रतिक्षित मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांनी मैदानावर आपली ताकद दाखविण्याची पूर्ण तयारी केली आहे. खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली असली, तरी या मैदानावर कोणता संघ बाजी मारतो. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. साहजिकच दिनेश कार्तिकची कॉमेंट्रीही चर्चेचा विषय बनेल.

हेही वाचा – NASA मध्ये पोहोचले क्रिकेट; स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणार अमेरिकेची क्रिकेट लीग

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.