Premium

IND vs AUS 2nd ODI: इंदूरमध्ये दोन्ही संघांसाठी आश्चर्यकारक योगायोग! जाणून घ्या होळकर स्टेडियमवरील भारताचा वनडे रेकॉर्ड

India vs Australia 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे, त्यातील दुसरा सामना रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर येथील होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल.

India Vs Australia 2nd ODI in Indore
इंदूरमध्ये दोन्ही संघांसाठी आश्चर्यकारक योगायोग (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

Know India’s ODI record at Holkar Stadium Indore: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना २४ सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. यावेळीही टीम इंडिया २४ सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. इंदूरमध्येही कांगारूंचा मार्ग सोपा नसेल, कारण होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड मजबूत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय विक्रमांबद्दल जाणून घेऊया.

इंदूरमध्ये टीम इंडिया अजिंक्य –

होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व आहे. टीम इंडियाच्या येथील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा नसेल. भारताने इंदूरमध्ये आतापर्यंत ६ वनडे सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने जगातील निवडक संघांना पराभूत केले आहे. या काळात भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.

हेही वाचा – Varanasi: सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ लिहिलेली टीम इंडियाची खास जर्सी दिली भेट, पाहा VIDEO

६ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा झाला होता पराभव –

इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामना खेळण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी २०१७ मध्ये याच स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने कांगारूंचा ५ विकेट्स राखून पराभव केला होता. तत्पूर्वी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना ६ गडी गमावत २९३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने १२४ आणि स्टीव्ह स्मिथने ६३ धावा केल्या.

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने २-२ विकेट घेतल्या. विजयासाठीचे २९४ धावांचे लक्ष्य भारताने ५ गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने सर्वाधिक ७८, रोहित शर्माने ७१ आणि अजिंक्य रहाणेने ७० धावा केल्या. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता.

हेही वाचा – Gautam Gambhir: गंभीरने नवीन उल हकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताच विराट कोहलीचे चाहते संतापले, जाणून घ्या कारण

सामन्याची तारीखही आहे खास –

६ वर्षांपूर्वी इंदूरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला, तो दिवस २४ सप्टेंबर २०१७ होता. यावेळीही टीम इंडिया २४ सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल. एकूणच आकडेवारी टीम इंडियाच्या बाजूने आहे. अशा स्थितीत भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus 2nd match updates know indias odi record at holkar stadium indore vbm

First published on: 23-09-2023 at 17:22 IST
Next Story
Varanasi: सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ लिहिलेली टीम इंडियाची खास जर्सी दिली भेट, पाहा VIDEO