scorecardresearch

Premium

VIDEO: के. एल. राहुलने कॅमेरून ग्रीनला दाखवले दिवसा तारे, असा खणखणीत षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियम बाहेर गेला

KL Rahul’s Sixes Video Viral: केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सुपर सिक्स मारला. राहुलने ग्रीनने टाकलेल्या चेंडूवर इतका जोरात प्रहार केली की, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. या षटकाराचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

IND vs AUS 2nd ODI Match Updates
केएल राहुलचा गगनचुंबी षटकार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

India vs Australia 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून ३९९ धावा केल्या. दरम्यान या सामन्यातील केएल राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय कर्णधार केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार षटकार ठोकला आहे. हा षटकार इतका लांब होता की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियासाठी आधीच षटकार ठोकत होते. अय्यर बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी होईल, असे वाटत होते. पण राहुलने येताच आपले इरादे स्पष्ट केले. राहुलने हा षटकार असा मारला की ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: विराट कोहलीने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेत विश्वचषकात रचला इतिहास, पाहा VIDEO
World Cup 2023 IND vs AUS Match Updates
World Cup 2023, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रिडीक्शनसह, जाणून घ्या सर्व काही
IND vs AUS: It's not easy to hit the ball where there is no fielder Aussie legend Mark Waugh's big statement on Suryakumar
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान
Suryakumar Yadav's sixes video in IND vs AUS 2nd ODI Match
पावसानंतरही ‘सूर्या’ तळपला! कॅमरुन ग्रीनला ठोकले सलग ४ षटकार, ३६० डिग्री फलंदाजाचा Video पाहिलात का?

राहुलने स्टेडियमच्या बाहेर पाठवला चेंडू –

राहुलने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर हा षटकार मारला. राहुल ९ चेंडूत ११ धावांवर खेळत होता. त्यानंतर वेगवान गोलंदाज ग्रीनला ३४ वे षटक टाकण्यासाठी पाठवण्यात आले. ग्रीनने ओव्हरचे दोन चेंडू टाकले, पण पुढचा चेंडू ग्रीनने टाकता राहुलने खणखणीत षटकार मारत चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर पाठवला. केएल राहुल आधीच मोठ्या शॉर्टसाठी तयार होता. आपल्या जागेवर उभा राहून राहुलने जोरदार बॅट फिरवली आणि बॉल स्टेडियमच्या बाहेर दर्शनासाठी पाठवला. हा षटकार ९४ मीटरचा होता. आता व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: शुबमन गिलने हाशिम आमलाचा विक्रम मोडत रचला इतिहास, झळकावले वनडेतील सहावे शतक

कर्णधार केएल राहुलने झळकावले दमदार अर्धशतक –

भारताला ४६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाचवा धक्का बसला. कर्णधार केएल राहुल भारताच्या ३५५ धावसंख्येवर बाद झाला. त्याला कॅमेरून ग्रीनने क्लीन बोल्ड केले. राहुलने ३८ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५२ धावांची वादळी खेळी केली. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. तो शतकानंतर १०५ धावा काढून बाद झाला. त्याने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus 2nd odi kl rahul hit cameron green for a six that went straight outside the stadium watch video vbm

First published on: 24-09-2023 at 19:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×