India became the first team to hit 3000 sixes in ODIs: इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजी करत ५० षटकांत ५ गडी गमावून ३९९ धावा केल्या. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार मारले. ज्यामध्ये ३१ चौकार आणि १८ षटकारांचा समावेश होता. या १८ षटकारांच्या आधारे टीम इंडिया वनडे फॉरमॅटमध्ये ३००० षटकार पूर्ण करणारा पहिला संघ बनला आहे. याआधी वनडेमध्ये कोणत्याही संघाने ३००० षटकार मारलेले नाहीत.
सूर्यकुमार यादवने लगावले सर्वाधिक षटकार –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून ७२ धावांची नाबाद खेळी करणारा फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या डावात सर्वाधिक ६ षटकार ठोकले. यानंतर शुबमन गिलने १०४ धावांच्या खेळीत ४ षटकार, श्रेयस अय्यरने १०५ धावांच्या खेळीत ३ षटकार, तर कर्णधार केएल राहुलने ५२ धावांच्या खेळीत ३ षटकार ठोकले. इशान किशननेही वेगवान खेळी खेळली आणि १८ चेंडूत ३१ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने २ षटकार ठोकले.




वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३००० षटकार मारणारा भारत पहिला संघ –
इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने १८ षटकार ठोकले, परंतु याआधी २०१३ मध्ये टीम इंडियाने बंगळुरूमध्ये या संघाविरुद्ध १९ षटकार ठोकले होते. भारतीय संघाने २०२३ साली इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९ षटकारही ठोकले होते. वनडेमध्ये भारताने २००७ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये बर्म्युडाविरुद्ध १८ षटकार मारले होते, तर २००९ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८ षटकार मारले होते.
भारतासाठी वनडे डावात सर्वाधिक षटकार –
१९ षटकार विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, २०१३
१९ षटकार विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर, २०२३
१८ षटकार विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
१८ षटकार विरुद्ध न्यूझीलंड, क्राइस्टचर्च, २००९
१८ षटकार विरुद्ध ऑस्ट्रेलिया, इंदूर, २०२३