scorecardresearch

Premium

पावसानंतरही ‘सूर्या’ तळपला! कॅमरुन ग्रीनला ठोकले सलग ४ षटकार, ३६० डिग्री फलंदाजाचा Video पाहिलात का?

Suryakumar Yadav hitting 4 consecutive sixes: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथे खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने कॅमेरून ग्रीनचा चांगलाच समाचार घेतला, ज्याच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav's sixes video in IND vs AUS 2nd ODI Match
सूर्यकुमार यादवच्या षटकांराची बरसात (फोटो-लोकसत्ता ग्राफिकस टीम)

Suryakumar Yadav 4 Sixes Cameron Green IND vs AUS 2nd ODI: सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा तो चमकता तारा, जो मैदानात आपल्या फलंदाजीच्या सनसनाटीने प्रेक्षकांच्या नसानसात भर घालतो. सूर्याची स्टायलिश फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्याने कॅमेरून ग्रीनचा अशाप्रकारे समाचार घेतला की इंदूरचे होळकर स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले. सूर्यकुमार यादवने षटकांराची बरसात केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

४४व्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर ठोकले सलग ४ षटकार –

सूर्यकुमार यादवची ही स्फोटक फलंदाजी ४३व्या षटकात पाहायला मिळाली. कॅमेरून ग्रीनच्या पहिल्याच चेंडूवर सूर्याने अगोदर तयारी करून डीप फाइन लेगवर स्फोटक षटकार ठोकला. यानंतर, त्याने आपले पाय घट्ट रोवले आणि दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा तयार झाला. त्याने फाइन लेगवर स्टायलिश षटकार मारून ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. आता तिसऱ्या चेंडूची पाळी होती. ग्रीनने तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण सूर्याने चेंडूची लांबी गाठली आणि एका शानदार षटकारासाठी तो डीप एक्स्ट्रा कव्हरवर मारला. तीन चेंडूत तीन षटकार मारल्यानंतर सूर्या उत्साहाने भरला होता. इथे ग्रीनची लयही बिघडली होता. त्यानंतर चौथ्या चेंडूवर सूर्याने डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार मारून युवराज सिंगची आठवण करून दिली

Suryakumar Yadav's luck will change in one innings Shreyas Iyer's position from World Cup playing XI in danger zone
IND vs AUS: ‘मिस्टर ३६०’ फॉर्ममध्ये परतला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने झळकावले तिसरे अर्धशतक; श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात
Pat Cummins Reaction After Defeat
IND vs AUS : ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे…’; भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्स असं का म्हणाला? जाणून घ्या
IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS: के. एल. राहुलने मार्नस लाबुशेनला धावबाद करण्याची संधी गमावल्याने सोशल मीडियावर ट्रोल, पाहा VIDEO
India won the toss and Rohit Sharma has decided to bat instead of Shardul Thakur Axar Patel player is included in the playing XI
IND vs SL: टीम इंडिया ठरला टॉसचा बॉस! रोहित शर्माने घेतला फलंदाजीचा निर्णय, शार्दुल ठाकूर ऐवजी ‘या’ खेळाडूचा प्लेईंग ११मध्ये समावेश

कॅमेरून ग्रीनने एकाच षटकाक दिल्या २६ धावा –

सूर्या ६ चेंडूत ६ षटकार मारेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती, पण ग्रीनने पाचवा चेंडू ऑफ स्टंपपासून लांब ठेवला. ज्यावर सूर्याने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारण्याचा प्रयत्न केला, पण इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि एकच धाव घेता आली. केएल राहुलने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत ओव्हर पूर्ण केले. या षटकात ग्रीन चांगलाच महागडा ठरला. त्याने ४४व्या षटकात २६ धावा दिल्या. सूर्याचा हा उत्साह पाहून चाहते खूप खूश आहेत.

हेही वाचा – VIDEO: के. एल. राहुलने कॅमेरून ग्रीनला दाखवले दिवसा तारे, असा खणखणीत षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियम बाहेर गेला

अखेरच्या टप्प्यात सूर्यकुमार यादवची वादळी खेळी –

केएल राहुलने ३८चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याचवेळी इंदूरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर रवींद्र जडेजा १३ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये २४चेंडूत ४४ धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus 2nd odi video of suryakumar yadav hitting 4 consecutive sixes for 26 runs in cameron greens overs vbm

First published on: 24-09-2023 at 19:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×