IND vs AUS 3rd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ५ गडी राखून विजय मिळवला. विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स आणि ३९ षटके बाकी असताना त्यांचा वाईट रीतीने पराभव केला. आता २२ मार्च रोजी चेन्नईत होणारा तिसरा आणि शेवटचा वनडे निर्णायक ठरणार आहे.

हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कांगारूंविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. गेल्या ३६ वर्षांपासून येथे ऑस्ट्रेलियाकडून कसोटी किंवा एकदिवसीय संघ पराभूत झालेला नाही. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकही टी-२० सामना झाला नाही. अशा स्थितीत कांगारू संघ पराभवासह मायदेशी परतणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही संघांमधील अखेरच्या सामन्यात हार्दिक पांड्या हिरो ठरला होता.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Heinrich Klaassen who scored an unbeaten 80 runs against MI
IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल

हेही वाचा – IPL 2023: पंजाब संघाला मोठा धक्का; ‘हा’ स्फोटक इंग्लिश फलंदाज आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता

चेपॉक स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा विक्रम –

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह एकूण ९ सामने झाले आहेत. टीम इंडियाने ४ सामने जिंकले असून २ सामने गमावले आहेत. दोन कसोटी अनिर्णित आणि एक बरोबरीत संपली. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर दोन सामने झाले आहेत. २०१४ मध्ये त्यांना एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – Team India: ‘…म्हणून भारतीय संघ १० वर्षे झाली तरी आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे वक्तव्य

या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला येथे कधीही विजय मिळवता आला नाही. हा सामना ऑक्टोबर १९८७ मध्ये खेळला गेला होता. दुसऱ्या वनडेत टीम इंडियाने २६ धावांनी विजय मिळवला होता. या दोन्ही संघांमधील शेवटचा सामना येथे २०१७ मध्ये खेळला गेला होता. टीम इंडियाने हा एकदिवसीय सामना जिंकला होता. १९८७ ते २०१७ पर्यंत ५ सामने झाले असून टीम इंडियाने ४ जिंकले आहेत.

हे खेळाडू २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले होते –

या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल खेळले, जे या संघात आहेत. तेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता. त्या सामन्यात रोहित आणि विराटची कामगिरी चांगली नव्हती. रोहित २८ आणि विराट खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. हार्दिक पांड्याने बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली होती. त्याने ६६ चेंडूत ८३ धावांची खेळी करत ८७ धावांत ५ विकेट गमावल्यानंतर टीम इंडियाला २८१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्याने महेंद्रसिंग धोनीसोबत ७९ धावांची शानदार भागीदारी केली होती.

हेही वाचा – IND vs AUS ODI: विश्वचषकाच्या तयारीवर आणि सूर्याच्या फॉर्मबद्दल द्रविडने दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘त्याला…’

हार्दिक पांड्या सामनावीर ठरला होता –

हार्दिक पांड्याने चेंडूनेही आश्चर्यकारक कामगिरी केली होती. त्याने ४ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश होता. हार्दिकला उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. अशा स्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेत तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो. त्याचबरोबर कुलदीप यादवने ३३ धावा देत २ आणि युजवेंद्र चहलने ३० धावा देत ३ बळी घेतले होते.