Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टॅम्प उडाला तरी मॅक्सवेल धावबाद कारण...; पाहा 'तो' नाट्यमय क्षण | Ind vs Aus 3rd T20 Video An almost Not Out for Glenn Maxwell one bail was still on the stumps and ball hit that bail scsg 91 | Loksatta

Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टंम्प उडाला तरी मॅक्सवेल धावबाद कारण…; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण

भारतीय खेळाडूंनीही मॅक्सवेलला बाद दिलं जाईल याची अपेक्षा सोडून दिली असतानाच पंचांनी वेगळाच निर्णय दिला.

Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टंम्प उडाला तरी मॅक्सवेल धावबाद कारण…; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण
त्याला बाद घोषित करणार नाही असं वाटत असतानाच वेगळाच निर्णय पंचांनी दिला

Ind vs Aus 3rd T20 Video Glenn Maxwell Runout: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यामध्ये मालिकेतील ड्राम कायम असल्याचं चित्र दिसलं. सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल अगदीच नाट्यमय पद्धतीने बाद झाला. एका क्षणाला भारतीय खेळाडूंनीही मॅक्सवेलला बाद दिलं जाईल याची अपेक्षा सोडून दिली असतानाच तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं आणि मैदानात एकच जल्लोष झाला.

नक्की पाहा >> Ind vs Aus: अक्षरने स्वत:च्याच गोलंदाजीवर पकडला ‘वेड’ लावणारा कॅच; तुफान फॉर्ममधील वेडच्या विकेटचा Video पाहाच

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. सालामीवीर कॅमरॉन ग्रीन आणि अॅरोन फिंचने ३.२ षटकांमध्येच ४० धावांचा टप्पा ओलांडला. नंतर मात्र ऑस्ट्रेलियन संघाला घरघर लागली. संघाची धावसंख्या ४४ असताना फिंच तंबूत परतला तर धावसंख्या ६२ वर असताना ग्रीनला भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर के. एल. राहुल झेलबाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला मॅक्सवेल फिरकी गोलंदाजांसमोर अडखळत खेळताना दिसला. मैदानात स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतानाच मॅक्सवेल धावबाद झाला. मात्र त्याचं धावबाद होणं अगदीच नाट्यमय ठरलं.

नक्की पाहा >> Ind vs Aus: भारतीय गोलंदाजांना कुटणाऱ्या ग्रीनबद्दल जाफरचं मोठं भाकित; Meme शेअर करत म्हणाला, “IPL संघ…”

आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असणारा मॅक्सवेल धावबाद झाला. अक्षर पटेलने अगदी सीमारेषेजवळून फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांना आदळला. मात्र चेंडू थेट यष्ट्यांना आदळण्याआधीच चेंडू पकडून मॅक्सवेलला यष्टीचीत करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिनेश कार्तिकचा हात लागल्याने बेल्स उडाल्या. हे सारं मोठ्या स्क्रीनवर पाहून सर्व भारतीय खेळाडूंनी मॅक्सवेलला बाद देण्याची अपेक्षा सोडून दिली. मात्र तिसऱ्या पंचांनी दुसरी बेल्स हाताने उडली होती की चेंडूने हे तपासण्यास सांगितले. त्यावेळी मॅक्सवेलची बॅट क्रीझबाहेर असताना कार्तिकचा हात लागूनही बेल्स यष्ट्यांवरच होती. चेंडू लागल्यानंतर ती बेल्स उडाली. त्यामुळेच मॅक्सवेल बाद असल्याचा निर्णय पंचांनी दिला आणि मैदानात एकच जल्लोष झाला. बीसीसीआयनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अनेक चाहते या धावबाद होण्याच्या निर्णयासंदर्भात ट्वीटरवरुन व्यक्त झाल्याचं पहायला मिळत आहे.

१)

२)

३)

४)

५)

हा निर्णय पाहून कर्णधार रोहित शर्मासहीत दिनेश कार्तिकही हसू लागल्याचं कॅमेरात कैद झालं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
खेळाडूसह बाचाबाची नडली, अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता; पाहा VIDEO

संबंधित बातम्या

Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
“तो खेळाडू भारताला विश्वचषक जिंकवून देईल” ब्रेट ली म्हणाला, “रोहित, द्रविडने फक्त….”
IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: राज्यातील किमान तापमानात वाढ होणार
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट