IND vs AUS 4th Test Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने १६७.२ षटकांत सर्वबाद ४८० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाककडून उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने या डावात महत्वाची भूमिका बजावली.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव ४८० धावांवर आटोपला. आज ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५५ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली होती. ज्यामध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो १७० चेंडूत ११४ धावा करून बाद झाला. अश्विनने ग्रीनला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य
Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Updates in marathi
IPL 2024 : रियान परागच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीला दिले १८६ धावांचे लक्ष्य

यानंतर ऑस्ट्रेलियाला ३८७ धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनने मिचेल स्टार्कला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०९ धावा केल्या होत्या. चहापानानंतर पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला अक्षर पटेलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला ४२२ चेंडूत १८० धावा करता आल्या. यानंतर नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. अश्विनने मर्फी (४१) ला एलबीडब्ल्यू आणि नंतर लायनला (३४) कोहलीच्या हाती झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाचा डाव ४८० धावांवर संपुष्टात आणला.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनचा धुमाकूळ; दोघांनी मोडला ६३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

अश्विनने या डावात एकूण सहा विकेट घेतल्या. 32व्यांदा त्याने कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी, त्याने भारतीय भूमीवर २६व्यांदा ही कामगिरी केली. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्यांदा कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कांगारूंविरुद्धच्या कसोटीत त्याने आतापर्यंत ११३ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनशिवाय शमीला दोन विकेट मिळाल्या. त्याचबरोबर अक्षर-जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.