scorecardresearch

IND vs AUS 4th Test: नाटू-नाटूची सर्वांनाच पडली भुरळ! सुनील गावसकर, रवी शास्त्रींसहित सर्वच कॉमेंट्रेटर्सने धरला ठेका, पाहा Video

भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या समालोचकांनी ऑस्कर पुरस्कार विजेत्या आर.आर.आर. चित्रपटातील नाटू-नाटू गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे.

All the commentators including Sunil Gavaskar Ravi Shastri dancing on this song
सौजन्य- हॉटस्टार (ट्विटर)

ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धची अहमदाबाद कसोटी निश्‍चितच ड्रॉ केली, पण लाजिरवाणे होण्यापासून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. भारताने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. अशाप्रकारे भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिकेत सलग चौथ्यांदा कांगारू संघाचा पराभव केला आहे. २०१६ पासून ऑस्ट्रेलियाला भारताने दोनदा त्याच्या घरी आणि दोनदा आपल्या घरी गुडघ्यावर आणले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५व्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाच्या अखेरपर्यंत फलंदाजी सुरू ठेवली आणि २ गडी गमावून १७५ धावा केल्या. सामना अनिर्णित घोषित होण्यास सुमारे एक तासाचा खेळ शिल्लक होता.

चित्रपटातील नाटू-नाटू गाण्यावर समालोचकांनी ठेका धरला

भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या समालोचकांनी ऑस्कर पुरस्कार विजेत्या आर.आर.आर. चित्रपटातील नाटू-नाटू गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील सामन्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यात अनेक मजेशीर किस्से घडले. एका व्हिडिओ लिटिल मास्टर सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला शोधत होते आणि त्यासाठी त्यांनी कॅमेराचा आधार घेत म्हटले की माझा मित्र कुठेच दिसत नाही. मला त्याला सांगायचे आहे की माझ्या देशाचा एक चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेला असून त्याला पुरस्कार मिळाला आहे. यावर हेडनने देखील कौतुक करत अभिनंदन केले. त्यानंतर गावसकर-हेडन यांनी सुप्रसिद्ध नाटू-नाटू गाण्यावर डान्स केला. दुसऱ्या बाजूला रवी शास्त्री यांनी देखील ठेका धरत ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉला नाचवले. संजय बांगर-दीपदास गुप्ता, जतीन सप्रू, संजय मांजेरकर, हर्षा भोगले या सर्वांनी डान्स करत मजा केली.

सामन्यात काय झाले?

याआधी भारतीय संघाने सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यामध्ये २०१७ मधील घरच्या मालिकेव्यतिरिक्त २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर जाऊन भारताने कांगारूंना पराभवाची धूळ चारली. दुसरीकडे न्यूझीलंडने ख्राईस्टचर्चमध्ये श्रीलंकेवर दोन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला ज्यामुळे भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ हंगामातील ही भारताची शेवटची मालिका होती. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला होता. आता हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये ७ ते ११ जून दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: घरच्या मैदानावर टीम इंडियाच शेर! चौथी कसोटी अनिर्णित; २-१ ने बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर कोरले नाव

मागील चार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकांचा निकाल

२०१७ – भारत २-१ने विजयी

२०१९ – भारत २-१ने विजयी

२०२१ – भारत २-१ने विजयी

२०२३ – भारत २-१ने विजयी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 17:08 IST