scorecardresearch

IND vs AUS 4th Test: ‘थांब विराट जरा धीर धर’, live सामन्यादरम्यान पेटपूजा करताना किंग कोहलीचा Video व्हायरल

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीचा काहीतरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

IND vs AUS 4th Test: Virat Kohli was seen eating chocolate while fielding on the field video went viral on social media
सौजन्य- हॉटस्टार (ट्विटर)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( ९ मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याचे नाबाद शतक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात विराट कोहलीचा काहीतरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, विराट कोहलीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विराट स्लिपवर उभा असताना पोटपूजा करताना दिसत आहे. विराटचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, लाइव्ह सामन्यादरम्यान विराट काय खात होता.

विराट कोहली भर सामन्यात चॉकलेट खातानाचा व्हिडिओ व्हायरल

वास्तविक, मार्नस लाबुशेन मैदानावर असताना ही घटना घडली. लाबुशेन त्याचा गार्ड घेत होता, त्याचवेळी विराट दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसला. कॅमेऱ्याचे लक्ष लाबुशेनवर होते, पण इतक्यात मागे उभ्या असलेल्या विराटने खिशात हात घातला, काहीतरी काढले आणि खायला सुरुवात केली. ही गोष्ट प्रथिने/ऊर्जा पट्टीशिवाय काहीच नाही. म्हणजेच तो चॉकलेट खात होता.

इतकेच नाही तर लाबुशेनने चेंडूचा सामना केल्यानंतर विराटने हे चॉकलेट आपल्या खिशातून काढले, मात्र यावेळी त्याने त्याचा सहकारी श्रेयस अय्यरला देखील ऑफर केली. अय्यरने विराटला नकार दिला, पण अशा स्थितीत त्याने अय्यरच्या दिशेने ते चॉकलेट फेकले. श्रेयसने ते चॉकलेट घेतले आणि खिशात टाकले. या घटनेचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत असून त्यांना तो प्रचंड आवडत आहे.

सामन्यात काय घडले?

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी हेड व ख्वाजा यांनी शानदार ६१ धावांची सलामी दिली. मार्नस लॅब्युशेन केवळ २ धावा करू शकला. त्यानंतर ख्वाजा व‌‌ कर्णधार स्मिथ ही जोडी जमली. त्यांनी दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला एकही यश मिळू दिले नाही. त्यांनी ७९ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सत्रानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद १४९ अशी होती. मात्र, अखेरच्या सत्रात त जडेजाने पहिल्यांदा स्मिथ याला बाद करण्यात यश मिळवले. त्याने ३८ धावा केल्या. पीटर हॅंड्सकॉम्ब केवळ १७ धावा करू शकला.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: उस्मान ख्वाजाचे धडाकेबाज शतक! ऑस्ट्रेलिया पहिल्याच दिवशी ड्रायव्हिंग सीटवर, भारताला विकेट्सची गरज

यानंतर मात्र ख्वाजाने कॅमेरून ग्रीनसह ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. ग्रीनने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघांनी पहिल्या दिवसाखेर भारताला यश मिळू दिले नाही. ख्वाजाने आपला संयम राखत दिवसातील अखेरच्या षटकात आपले १४वे शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५५ धावा केल्या. ख्वाजा १०४ तर ग्रीन ४९ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघासाठी मोहम्मद शमी यांनी दोन तर अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 17:36 IST