IND vs AUS 2nd Test Day 1 Highlights in Marathi: भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना ऍडलेटमध्ये खेळवला जात असून पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने या सामन्यात वर्चस्व गाजवलं आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारताला १८० धावांवर सर्वबाद केले आणि त्यानंतर तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ १ बाद ८५ धावा करत बाद झाला.

रात्र दिवस कसोटी सामना असल्याने हा दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू झाला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने पहिल्या दोन सत्रात फलंदाजी केली आणि सर्वबाद झाल्यानंतर तिसऱ्या सत्रात फलंदाजी करण्याची ऑस्ट्रेलियाची पाळी होती. दुसऱ्या सत्रात फलंदाजी करत असताना अंधार पडायला लागल्यावर फ्लडलाईट सुरू झाले. संपूर्ण अंधार पडल्यानंतर अचानक एका षटकात फ्लडलाईट बंद झाले आणि संपूर्ण स्टेडियममध्ये अंधार पसरला.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?

हेही वाचा – Nitish Reddy: “मी वडिलांना रडताना पाहिलं अन्…”, नितीश रेड्डीने सांगितला जीवनातील टर्निंग पॉईंट; विराटबाबत पाहा काय म्हणाला?

प्रेक्षकांपासून ते खेळाडूंपर्यंत सर्व जण चकित झाले की नेमकं काय घडलं. ही संपूर्ण घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील १८व्या षटकात घडली. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा टाकत होता. या षटकातील फक्त दोन चेंडू त्याने टाकले आणि एक सोडून फ्लडलाईट बंद झाले, यामुळे खेळ अचानक थांबला. काही वेळाने ते पुन्हा सुरू झाले. यानंतर हर्षित राणाने २ चेंडू टाकले आणि पुन्हा लाईट बंद झाले.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज

दुसऱ्यांदा अचानक लाईट बंद झाल्याने खेळात पुन्हा खंड पडला. मात्र, यावेळी चाहत्यांनी मोबाईलचे दिवे लावले आणि त्याचा आनंद लुटू लागला. हर्षित राणा रनअपवर असताना ही घटना घडली आणि लाईट बंद झाल्यामुळे तो खूपच वैतागलेला दिसत होता. यादरम्यान चाहत्यांनी मोबाईलचे टॉर्च लावले होते. दोन वेळा सुरू असलेल्या सामन्यात लाईट गेल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

हेही वाचा – IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?

भारताला १८० धावांत गुंडाळल्यानंतर कांगारू संघ पहिल्या डावात अतिशय मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने ३३ षटकांत
८६ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजाच्या रूपाने ऑस्ट्रेलियाने एकमेव विकेट गमावली. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून लबुशेन २० धावा तर नाथन मॅकस्विनी ३८ धावा करत खेळत आहे. लाईट गेल्यामुळे पहिल्या दिवशी ३-४ मिनिटं सामना जास्त खेळवला गेला.

Story img Loader