Ind vs Aus Axar Patel caught and bowl Mathew Wade Video: भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचा शेवटचा सामना हैदराबादमध्ये खेळवला जात असून या सामन्यामध्येही मालिकेतील आधीच्या दोन सामन्याप्रमाणेच फिरकीपटू अक्षर पटेलने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे या मालिकेतील आपल्या शेवटच्या षटकामध्ये अक्षरने तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या मॅथ्यू वेडला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केल्याचं पहायला मिळालं. अक्षर या मालिकेमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. वेडला बाद करण्यासाठी अक्षरने पकडलेला झेलही अगदी वेड लावणारा होता असं म्हटल्यास अतिषयोक्ती ठरणार नाही.

नक्की पाहा >> Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टॅम्प उडाला तरी मॅक्सवेल Runout देण्यात आलं; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आपल्या चार षटकांमध्ये ३३ धावा देत ३ गडी बाद केले. यामध्ये त्याने सलामीवीर अॅरॉन फिंच, जोस इंग्लीस आणि मॅथ्यू वेड यांना तंबूत पाठवलं. ग्लेन मॅक्सवेललाही सीमारेषेजवळून भन्नाट थ्रो करत अक्षरने धावबाद केलं. आपल्या शेवटच्या आणि सामन्यातील चौदाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर अक्षर दोन चेंडू खेळलेल्या वेडला गोलंदाजी करत होता. याचवेळी त्याने वेडला कॉट अॅण्ड बोल्ड केलं.

नक्की पाहा >> Ind vs Aus: भारतीय गोलंदाजांना कुटणाऱ्या ग्रीनबद्दल जाफरचं मोठं भाकित; Meme शेअर करत म्हणाला, “IPL संघ…”

षटकातील शेवटचे दोनच चेंडू उरल्याने ते खेळून काढण्याचा वेडचा प्रयत्न होता. वेडने अक्सचा चेंडू सरळ खेळून काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो थेट अक्षर पटेलच्या दिशेने उडाला. अक्षरने क्षणाचाही वेळ न लावता आपल्या डावीकडे झेपावत अगदी जमीनीलगत अलगद झेल टीपला. वेडने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तर दुसऱ्या सामन्यातही त्याने तुफान फटकेबाजी करत पाहुण्या संघाला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहचवत आव्हानात्मक लक्ष्य देण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात वेडची नाही तर अक्षरच्या फिरकीची जादू चालली.

१)

२)

अक्षरने या मालिकेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेत एकूण १० षटकं टाकली त्यामध्ये ६३ धावा देत त्याने आठ गडी तंबूत पाठवले. यामध्ये फिंचला दोनदा, ग्रीन आणि इंगलीसला दोनता तर मॅक्सवेल, वेड, टीम डेव्हीडला एकदा बाद केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus axar patel caught and bowl mathew wade video scsg
First published on: 25-09-2022 at 20:53 IST