Premium

Babar Azam: बाबर आझमने शुबमन गिलला विश्रांती दिल्याने राहुल द्रविडचे मानले आभार, काय आहे सत्य? जाणून घ्या

Babar Azam on Shubaman Gill: युवा सलामीवीर शुबमन गिलला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा मागे टाकून आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी होती. मात्र, शेवटच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

IND vs AUS: Babar actually thanked Dravid for giving Shubman a break Know the truth about viral posts
बाबर आझमने राहुल द्रविडचे आभार मानले आहेत. सौजन्य- (ट्वीटर)

Babar Azam on Shubaman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलची बॅट सध्या खूप तळपत आहे. गिल प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे. विश्वचषकापूर्वी गिलचा फॉर्म पाहता हा युवा फलंदाज आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करेल अशी अपेक्षा भारतीय संघ करत आहे. गिलला नंबर वन फलंदाज म्हणून विश्वचषकात प्रवेश करण्याची संधी होती पण आता त्याने ही संधी गमावली आहे. याचा अर्थ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहील आणि तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज म्हणून विश्वचषकात प्रवेश करेल. यावर बाबर आझमने राहुल द्रविडचे आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ वर्षीय गिलला बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मोहाली वन डेत त्याने ७४ धावांची खेळी केली होती तर इंदोरमध्ये गिलने १०४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, बाबर आझमला मागे टाकून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्याची सुवर्ण संधी शुबमन गिलकडे होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिलने ज्या प्रकारे २ अर्धशतक केले होते, त्यावरून स्पष्टपणे दिसून येते की तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या चांगल्या फॉर्मच्या जोरावर तो राजकोट वन डेमध्ये मोठी खेळी खेळू शकला असता पण, आता बातमी येत आहे की, गिलला राजकोट वन डेत विश्रांती देण्यात आली आहे.

बाबर आझमने राहुल द्रविडचे खरच मानले आभार, काय आहे सत्य? जाणून घ्या

आगामी मोठ्या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी बाबर आझमने पत्रकार परिषद घेऊन आपली रणनीती स्पष्ट केली. भारतीय खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळते, असे मी क्रिकेट तज्ञांकडून ऐकले असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय माझा माझ्यापेक्षा संघातील सहकारी खेळाडूंवर अधिक विश्वास असून ते चोख कामगिरी पार पाडतील असा विश्वास देखील पाकिस्तानी कर्णधाराने व्यक्त केला. खरं तर भारतीय सलामीवीर शुबमन गिल आणि बाबर आझम यांच्यात आयसीसी क्रमवारीत रस्सीखेच सुरू आहे. आताच्या घडीला बाबर अव्वल तर गिल दुसऱ्या स्थानी स्थित आहे. यावरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. अशातच ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’च्या फेक अकाउंटवरून एक खोटी बातमी पसरवली जात आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुबमनने तुफानी शतक झळकावून बाबरच्या अव्वल स्थानाला थोडेसे हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या सामन्यात शुबमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे. याचाच आधार घेत बाबर आझम भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे आभार मानत असल्याचे या व्हायरल पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये सांगितले की, बाबरने द्रविडचे आभार मानले आहेत. कारण त्याने शुबमनला तिसऱ्या वन डे सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाबर आझम आणखी काही दिवस अव्वल स्थानी राहीन. लक्षणीय बाब म्हणजे ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत असली तरी हे अकाउंट पीसीबीचे नसून फेक आहे.

गिल ८१४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली असून त्यात शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमनंतर गिल ८१४ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर ८५७ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गिल बाबरपेक्षा ४३ गुणांनी मागे आहे. मोहाली वन डेमध्ये गिलने ६३ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या तर इंदोरमध्ये त्याने ९७ चेंडूत १०४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा: Babar Azam: विश्वचषक २०२३साठी भारतात येण्यापूर्वी बाबर आझमचे सूचक विधान; म्हणाला, “मला माझ्याच खेळाडूंवर विश्वास…”

शुबमन गिलची प्रतीक्षा वाढली

वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघर्ष करणाऱ्या शुबमन गिलने आशिया कप २०२३ मध्ये शानदार पुनरागमन केले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेतही त्याने आशिया चषकाची गती कायम ठेवली. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता गिलला ५ ऑक्टोबरपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus babar azam thanks rahul dravid for resting shubman gill whats the truth find out avw

First published on: 26-09-2023 at 23:09 IST
Next Story
Suryakumar Yadav: “फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे…”, ऑस्ट्रेलियन दिग्गज ‘मार्क वॉ’ चे सूर्यकुमारबाबत मोठे विधान