scorecardresearch

IND vs AUS 3rd Test: ‘वाह क्या बात है’! ऑसी कर्णधार स्मिथचा झेल पाहून पुजाराही झाला थक्क; Video व्हायरल

भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पण स्मिथने त्याचा अप्रतिम झेल पकडून त्याला तंबूत पाठवले.

IND vs AUS 3rd Test: Wah Kya Baat Hai Pujara was stunned to see Smith's amazing unbelievable catch Video viral
सौजन्य- हॉटस्टार (ट्विटर)

इंदोर येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात भारतीय संघाला रोखत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. पहिल्या डावात मिळालेल्या ८८ धावांच्या आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात कसून गोलंदाजी केली. अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याने ८ बळी मिळवत भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर संपवला. आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी ७६ धावांचे आव्हान असेल. त्यात ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथने पुजाराचा पकडलेला झेलने सामन्याचे पारडे फिरवले. अप्रतिम असा झेल घेत त्याने सर्वांनाच थक्क करून सोडले.

इंदोरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी खराब फलंदाजी केली, त्यामुळे टीम इंडिया सलग दोन सामने जिंकून तिसरा सामना हरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने १९७ धावा केल्या आणि ८८ धावांची आघाडीही मिळवली. याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या डावात नॅथन लायनसमोर भारतीय फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि विकेट गमावत राहिले, पुजाराने एका टोकाकडून डाव सांभाळला, पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर स्मिथला तंबूत परतावे लागले. त्याने स्लिपमध्ये एक शानदार झेल पकडला.

पुजाराने सर्वाधिक ५९ धावा केल्या

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला चेतेश्वर पुजारा ५९ धावा करून बाद झाला, त्याला स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये नॅथन लायनवी झेलबाद केले. पुजारा असा फलंदाज होता जो ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना खेळवू शकतो. त्याने १४२ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने एकूण ५९ धावा केल्या. मात्र, नंतर त्याची नॅथन लायनने शिकार केली.

स्टीव्ह स्मिथने पकडला पुजाराचा अप्रतिम झेल, पाहा

ऑस्ट्रेलियासाठी नॅथन लायनने ५७ वे षटक आणले. या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर पुजाराच्या बॅटमधून चेंडू एका काठाने बाहेर आला, जो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथला डायव्हिंग देऊन झेलबाद झाला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. स्टीव्ह स्मिथने उजवीकडे डायव्ह टाकला आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे पुजारा निराश होऊन तंबूत परतला.

शुबमन गिल बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या चेतेश्वर पुजाराने आपल्या बचावावर विश्वास व्यक्त केला आणि एकीकडे विकेट्स सातत्याने पडत असताना दुसरीकडे पुजाराने एक टोक राखून छोट्या भागीदारी रचताना दिसला. दुसऱ्या डावात त्याने श्रेयस अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ३५ धावांची भागीदारी केली, जी दुसऱ्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. अर्धशतक झळकावल्यानंतर पुजारानेही षटकार ठोकला आणि भारताची आघाडी १००च्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ५७व्या षटकात लियॉनविरुद्ध चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. चेंडू बॅटच्या काठावर गेला आणि लेग स्लिपवर उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे गेला, जिथे त्याने उजवीकडे जाणारा चेंडू एका हाताने पकडला आणि नंतर त्याच्या पाठीवर पडला.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: नॅथन लायनची भेदक गोलंदाजी! ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंसमोर भारताचे लोटांगण, विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान

नॅथन लायनने आपल्या कसोटी कारकिर्दीत १३व्यांदा चेतेश्वर पुजाराला आपला बळी बनवले आहे. चेतेश्वर पुजारा १४२ चेंडूत ५९ धावा करून तंबूत परतला. त्याने या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार मारला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायन भारताच्या आघाडीच्या फलंदाजांविरुद्ध प्रभावी ठरला आहे. नॅथनने रहाणेला १० वेळा, रोहित शर्माला ८ वेळा आणि विराट कोहलीला ७ वेळा कसोटीत बाद केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 18:09 IST
ताज्या बातम्या