scorecardresearch

IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरने पूर्ण केली भारतीय चाहत्यांची इच्छा, फोटोसाठी पोज देऊन जिंकली सर्वांची मनं, पाहा व्हिडिओ

नागपूरवर चाहत्यांच्या गराड्यात डेव्हिड वॉर्नर अडकला मात्र त्याने असे काही केले की सर्वच भारतीयांचे मन त्याने जिंकून घेतले. ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

IND vs AUS: David Warner fulfilled the wishes of Indian fans, won everyone's heart by posing for a photo watch video
सौजन्य- (ट्विटर)

IND vs AUS Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका ९ फेब्रुवारी २०२३ पासून भारतात होणार आहे. ही मालिका ४ सामन्यांची असेल. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून त्याचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारतासाठी मोठी अडचण ठरू शकतो. वॉर्नर धोकादायक फॉर्ममध्ये असून बेंगळुरूमधील सत्र संपवून तो संघासह आता नागपूरला पोहोचला आहे. त्याचवेळी बंगळुरू विमानतळावर तो अनेक भारतीय चाहत्यांना भेटला ज्यांच्यासोबत त्याने फोटोही काढले.

डेव्हिड वॉर्नरने भारतीय चाहत्यांसोबत फोटो काढला

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरही भारतात खूप लोकप्रिय आहे. तो बर्‍याच काळापासून आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे आणि दरवर्षी या स्पर्धेतही खेळतो, ज्यामुळे भारतीय चाहते त्याला खूप आवडतात. वॉर्नरचेही भारतावर खूप प्रेम आहे आणि अनेकवेळा तो भारतीय गाण्यांवर डान्सचे व्हिडिओही शेअर करत असतो. अशा परिस्थितीत जेव्हा वॉर्नर बंगळुरू विमानतळावर पोहोचला तेव्हा चाहत्यांनी त्याला घेरले आणि फोटोची मागणी केली, त्यावर वॉर्नरने आनंदाने सर्वांसोबत फोटो क्लिक केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे आणि लोक वॉर्नरचे खूप कौतुक करत आहेत.

रोहित-राहुल सलामी देतील

भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरच्या मते, भारतीय संघाने नागपूर कसोटीत केएल राहुल आणि रोहित शर्मा या त्यांच्या मजबूत सलामीच्या जोडीसोबतच खेळले पाहिजे. दोघांची सुरुवात चांगली झाली आणि त्यांचा समन्वय चांगला आहे. याशिवाय चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर, तर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे.

श्रेयस अय्यरच्या जागी या खेळाडूला स्थान देण्यात आले

श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर कसोटीतील भारतीय संघासमोर सर्वात मोठा प्रश्न पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूचा आहे. वसीम जाफरने याचे उत्तर दिले असून त्याने या पदावर सूर्यकुमार यादवच्या जागी युवा खेळाडू शुभमन गिलला संधी दिली आहे. वसीम जाफरने यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतला सहाव्या क्रमांकावर ठेवले आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: “लेकिन वे भाड़ में जाने से…” जावेद मियाँदादची केली बोलती बंद करत व्यंकटेश प्रसादचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

भारतातील कसोटी सरासरी खूपच कमी आहे

डेव्हिड वॉर्नरची भारतातील कामगिरी खूपच खराब आहे. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियात ५८ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र, भारतात त्याची सरासरी २४ च्या जवळपास आहे. वॉर्नरने भारतात १८ कसोटी सामन्यांमध्ये केवळ ३५च्या सरासरीने ११४८ धावा केल्या आहेत.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क. मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या