महान ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे मत आहे की, ९ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका कांगारू संघ जिंकू शकतो, कारण यावेळी टीम इंडिया घरच्या मैदानावर खूपच कमकुवत आहे. ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा समतोल बरोबर नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅपलने लिहिले की, “ऑस्ट्रेलिया ही मालिका जिंकू शकतो. ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह सारख्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारताला मायदेशात घरच्या मैदानावर अधिक असुरक्षित वाटते आहे. ते विराट कोहलीवर जास्त अवलंबून राहतील. परदेशी संघांना अनेकदा त्याच्या खेळीने आश्चर्यचकित केले आहे. बहुतेक वेळा समतोल राखणारा ऑस्ट्रेलियाचा संघ असून टीम इंडियाला हरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया संघातील काही खेळाडू अचानक चमकून जातात मात्र भारतीयांना याची सवय झाली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मन, फलंदाजी आणि गोलंदाजी या तिन्हीवर लवकर जुळवून घेणे आवश्यक आहे.”

अ‍ॅश्टन अ‍ॅगरला संधी मिळू शकते

७४ वर्षीय चॅपेल म्हणाले, “जर खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल, तर मला आशा आहे की अ‍ॅश्टन अ‍ॅगरला संधी मिळेल, कारण फिंगर स्पिन अधिक अचूक मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी घेणारा अनिल कुंबळे क्वचितच सरळ आणि अरुंद मार्गापासून गोलंदाजी करताना भटकला. तो नेहमी वेगवान, सपाट लेग ब्रेक चेंडूने स्टंपला लक्ष्य करत असे. फलंदाज जर चुकले तर ते अडचणीत येतील हे खेळाडूंना माहीत होते. जडेजाही असाच गोलंदाज आहे. अ‍ॅगरला हेच करावे लागेल.”

हेही वाचा: Sunil Gavaskar: “आता तूच माझा आदर्श” ना कोहली, ना सचिन लिटल मास्टर कोण आहे सुनील गावसकरांचा हिरो?

चॅपेल पुढे म्हणाले की, “ऑस्ट्रेलियालाही काही समस्या सोडवाव्या लागतील. डेव्हिड वॉर्नर खराब फॉर्ममध्ये आहे आणि भारतातील त्याच्या कसोटी रेकॉर्डमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. उस्मान ख्वाजा, अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरॉन ग्रीन यांना पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या फिरकीपेक्षा अधिक दर्जेदार फिरकीचा सामना करायचा आहे” मार्कस लाबुशेन त्याची आशियातील पहिल्या मोठ्या कसोटी परीक्षेला समोरा जाणार असून स्टीव्ह स्मिथच्या अलीकडील फलंदाजीची वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बीबीएलपेक्षा अधिक बारकाईने फलंदाजीचे परीक्षण केले जाईल.”

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील नंबर वन कसोटी संघासाठी ही मालिका ‘अंतिम सीमा’ असेल. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच ऍशेस आणि त्यानंतर पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका जिंकून चांगली कामगिरी केली आहे. ते १९ वर्षात भारतात पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. २०१७ मध्ये भारताच्या त्यांच्या शेवटच्या दौऱ्यात, त्यांनी पुणे कसोटीत मोठ्या विजयाने सुरुवात केली पण मालिका १-२ ने गमावली. दुसरीकडे, भारत एका दशकाहून अधिक काळ मायदेशात हरलेला नाही आणि सलग १५ मालिका जिंकण्याचा विक्रम आहे.

भारतीय खेळपट्ट्या आता गूढ राहिलेल्या नाहीत

चॅपेल म्हणाले, “ऑस्ट्रेलियन खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी त्यांची प्रतिभा आणि अनुभव वापरावा लागेल. भारतीय खेळपट्ट्या आता रहस्य राहिलेले नाही. दौरे अधिक नियमित होतात आणि आयपीएलच्या माध्यमातून खेळाडूंना येथील परिस्थितीची जाणीव होते. जर पाचव्या दिवसापर्यंत सामना झाला तर भारताच्या जिंकण्याची शक्यता वाढेल. दिल्ली आणि धरमशाला भारताचा बालेकिल्ला असेल. नागपूर ही लाल मातीची खेळपट्टी आहे, ज्यावर पहिले तीन दिवस फलंदाजी उत्तम असते, त्यानंतर चेंडू वळतात. अहमदाबादमध्येही असेच आहे. भारतातील काळ्या मातीच्या खेळपट्ट्या, संघाच्या गरजेनुसार खेळपट्ट्या बनवल्या जातील.”

हेही वाचा: IND vs AUS: “कांगारूंना स्लेजिंगशिवाय दुसरं येतंच काय?” आर. अश्विनचा ऑस्ट्रेलियन संघावर घणाघात, सराव सत्रात स्मिथला फुटला घाम

चॅपल म्हणाले, “जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला नवीन चेंडूने विकेट्स घ्याव्या लागतात. चेंडू मऊ झाल्यावर त्यांनी कमी गोलंदाजी करावी आणि नंतर जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करावा. भारताकडे फिरकीमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक पर्याय आहेत. पण आपण नेहमीच आपला खेळ खेळला पाहिजे. आम्ही आमचे चार सर्वोत्तम गोलंदाज आणि कॅमेरून ग्रीन यांना संघात ठेवले पाहिजे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus indian fans will not like greg chappells prediction considering rohit sharmas team weak avw
First published on: 04-02-2023 at 17:36 IST