Gautam Gambhir has suddenly returned home after IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत सध्या पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने २९५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कुटुंबासह मायदेशी परतला आहे. गौतम गंभीर वैयक्तिक कारणांमुळे माघारी परतला आहे.

delhi assembly election loksatta news,
मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी आता दिल्ली विधानसभेच्या मैदानात… ‘हे’ आहेत भाजपचे ४० स्टार प्रचारक
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Vasai, Bhayandar police , Vasai, Bhayandar police force,
वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
If Diva Ratnagiri train does not start from Dadar then Gorakhpur train will be stopped
दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा
tiger ran away from farmer
वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर

आता गौतम गंभीर कॅनबेरा येथे ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात तो उपस्थित राहण्याची शक्यता नाही. तथापि, ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या गुलाबी चेंडू कसोटीपूर्वी गंभीर अॅडलेडमध्ये थेट संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघ बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी कॅनबेराला रवाना होईल, जिथे संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या अधिकृत स्वागत समारंभात उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

गौतम गंभीर अचानक मायदेशी का परतला?

बीसीसीआयच्या एका सूत्राने मंगळवारी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “होय, गौतम गंभीर वैयक्तिक आणीबाणीमुळे तो भारतात परतला आहे. त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. माात्र, तो ॲडलेडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी परतण्याची शक्यता आहे.” दुसऱ्या कसोटीच्या (गुलाबी चेंडू) तीन दिवस आधी तो ३ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला परतेल.

हेही वाचा – IPL 2025 Unsold Players List : डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन आणि शार्दुल ठाकुरसारखे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड, पाहा यादी

दोन दिवसीय गुलाबी चेंडूच्या सामन्यामुळे भारतीय संघाला सराव करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान इलेव्हनमध्ये युवा खेळाडूंचा भरणा आहे, पण वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड खेळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताचा या सामन्यात चांगला सराव होण्याची शक्यता आहे. खेळाचे नियम दोन्ही संघ ठरवतील आणि सर्व खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे, कारण त्याला अधिकृत दर्जा दिला जाणार नाही.

Story img Loader