India vs Australia Test Series: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ च्या तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतणार आहे.. मात्र, १ मार्चपूर्वी सुरू होणाऱ्या इंदूर कसोटीपूर्वी तो भारतात परतेल. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले असून या दोन्ही सामन्यांमध्ये कांगारूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. नागपूर कसोटीत टीम इंडियाने पाहुण्यांचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाला दिल्लीत ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांत संपले. तिसरी कसोटी सुरू होण्यासाठी १० दिवसांचा अवधी आहे, अशावेळी पॅट कमिन्स मायदेशी परतला असून तो उर्वरित कसोटीसाठी मालिकेसाठी परतणार आहे.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

न्यूजकॉर्पच्या वृत्तानुसार, २९ वर्षीय पॅट कमिन्स इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी काही दिवसांसाठी सिडनीला जाईल आणि त्यानंतर भारतात परतेल. भारताविरुद्धच्या सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आता मोठा धक्का बसला आहे. त्यांनी यापूर्वीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे दोन सामने गमावले आहेत. आता त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला आहे. कमिन्स कुटुंबातील आजारपणामुळे तो आज सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात, ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर मिचेल स्वीपसन त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. त्याच्या जागी संघात क्वीन्सलँडचा संघ सहकारी मॅथ्यू कुहनेमनला कसोटी संघात स्थान देण्यात आले होते.

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: पराभवामुळे निराश झालेल्या कमिन्सने फलंदाजांना दिला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘शॉट खेळताना प्रत्येकाने…’

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारताने रविवारी ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सने मात करत २-० अशी आघाडी घेतली. कमिन्स दिल्लीत ऑस्ट्रेलियाच्या एकादश संघात एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून खेळला. सामन्याच्या चौथ्या डावात त्याने गोलंदाजी केली नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेले ११५ धावांचे लक्ष्य भारताने सहज गाठले.