भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ एका महिन्याहून अधिक कालावधीच्या दौऱ्यासाठी भारतात पोहोचला आहे. त्याचबरोबर सरावालाही सुरुवात केली आहे. क्रिकेट तज्ज्ञही या मालिकेसाठी उत्सुक आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन याने विराट बाद करण्यासाठी एक युक्ती सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीविरुद्ध पॅट कमिन्सच्या संघाला संयम बाळगावा लागेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन याने व्यक्त केले. थॉमसनच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोहलीला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढावे लागेल. दोन्ही संघातील बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे खेळला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या शोमध्ये म्हणाला, “जर तुम्ही विराटला गोलंदाजी करत असाल, तर तुम्ही इतरांना गोलंदाजी करत असाल. तुम्हाला त्याला बांधून ठेवावे लागेल. त्याली त्रास द्यावा लागेल. त्याला धावा करू देऊ नका, त्याला शांत ठेवणे सोपे नाही कारण त्याच्याकडे शॉटचे अनेक पर्याय आहेत.”

हेही वाचा – MS Dhoni New Look: हातात पिस्तूल.. पोलिसांचा गणवेश… एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल! तुम्ही पाहिला का?

जेफ थॉमसन पुढे म्हणाला, ”त्याला जोखीम घेण्यास भाग पाडा. त्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा. बोलणे सोपे आहेस करणे नाही. चांगले गोलंदाज हे करण्यात पटाईत असतात. विव्ह रिचर्ड्स, ग्रेग चॅपेल, सनी गावस्कर या दिग्गज फलंदाजांना तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी केली असते.”
विराट कोहलीने वनडे आणि टी-२० मध्ये शतकांचा दुष्काळ संपवला आहे. पण तो अजूनही कसोटी फॉरमॅटमधील २८व्या शतकाची वाट पाहत आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते.

हेही वाचा – IND W vs SA W Final: दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताची खराब फलंदाजी, विजयासाठी केवळ ११० धावांचे लक्ष्य

थॉमसन पुढे म्हणाला, “तुम्ही मागे हटू शकत नाही. तुम्हाला डोकं वापरावं लागेल. ही तुमची त्याच्याशी (कोहली) मानसिक लढाई असेल. जो आधी कमजोर पडेल तो हरेल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला त्याच्यापेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हावे लागेल.”

भारतीय कसोटी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus test series australian legend jeff thomson has revealed the trick to dismiss virat kohli vbm
First published on: 02-02-2023 at 21:56 IST