scorecardresearch

IND vs AUS Test Series: भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. कसोटी मालिकेसाठी संघ त्यांनी जाहीर केला असून मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.

IND vs AUS Test Series: भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो
सौजन्य- (ट्विटर)

भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकांनंतर बहुप्रतिक्षीत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची ही कसोटी मालिका फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळली जाणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या दृष्टीकोनाने ही मालिका भारतासाठी अंत्यत महत्वाची आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचा १८ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.

अशातच कॅमेरून ग्रीन आणि मिचेल स्टार्क या संघात पुनरागमन करत आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान हे दोन्ही खेळाडू जखमी झाले होते. मात्र, या दोघांचाही भारत दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरू शकलेले नाहीत. पण भारत दौऱ्याला अजून एक महिना बाकी आहे.

मिचेल स्टार्क पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याचवेळी ही मालिका सुरू होण्यापूर्वीच पाहुण्या कांगारू संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार वेगवान गोलंदाज बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत कॅच घेताना स्टार्कला त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या मधल्या बोटाला ही दुखापत झाली होती.

सोमवारी असोसिएटेड प्रेसला त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देताना स्टार्क म्हणाला की, “मी पहिली कसोटी खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. आशा आहे की, जर मला संघ खेळवणार असेल तर मी दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेन. संघाला माझी गरज असून याची मला देखील जाणीव आहे.”

कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यातही बाद होऊ शकतो

स्टार्कशिवाय ऑस्ट्रेलियाचा युवा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीनलाही पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्याची शक्यता आहे. बोटाच्या दुखापतीमुळे ग्रीनही या सामन्यातून बाहेर राहू शकतो. मात्र, मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही खेळाडूंचे पुनरागमन होईल, असे मानले जात आहे. आगामी कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघासमोर कडवे आव्हान असणार आहे.

हेही वाचा: Ranji Trophy: रणजी ट्रॉफीत घडला नवा इतिहास! पहिल्यांदाच महिलांना मिळाली अंपायरिंग संधी, BCCIचा वेगळा उपक्रम

ऑस्ट्रेलियाचा मास्टर स्ट्रोक ही टीम इंडियासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. कारण युवा स्टार टॉड मर्फीचा ऑसी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाने ॲश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे. एकूणच ४ फिरकी गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियन संघ भारताविरूद्ध कसोटी खेळणार आहे.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 12:20 IST

संबंधित बातम्या