scorecardresearch

IND vs AUS:  ‘एक तेरा एक मेरा…’, अश्विन-जडेजाने एकत्र पुरस्कार घेत असा साजरा केला अक्षय कुमारचा फिल्मी डायलॉग, पाहा Video

Ashwin-Jadeja Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. या संपूर्ण मालिकेत अश्विन आणि जडेजाने आपल्या फिरकीने वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूप त्रास दिला.

IND vs AUS: Ek Tera Ek Mera Ashwin-Jadeja shared 47 wickets together celebrated Akshay Kumar's film dialogue like this Video
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

Ashwin-Jadeja Viral Video: सोमवारची (१३ मार्च) सकाळ भारतासाठी दोन मोठे आनंद घेऊन आली. एकीकडे भारताने ऑस्करमध्ये दोन पुरस्कार जिंकले आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाल्यानंतर ज्युनियर एनटीआरमधील ‘नाटू-नाटू’ आणि रामचरणच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे.

याआधी भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे देखील ज्युनियर एनटीआर आणि रामचरण बनले आहेत. दोघांनी त्याचे गाणे रिक्रिएट केले आहे. यासोबतच अक्षर कुमारच्या ‘हेरा फेरी’ चित्रपटातील डायलॉगही कॉपी करण्यात आला आहे.

वास्तविक, RRR चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा’ पुरस्कार मिळाला. त्याचवेळी ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने लघुपट डॉक्युमेंटरी प्रकारात ऑस्कर पुरस्कार पटकावला. यानंतर, सोमवारी संध्याकाळी सामना संपल्यानंतर अश्विनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो जडेजासोबत हेरा फेरी चित्रपटातील एक प्रसिद्ध मजेदार दृश्य पुन्हा तयार करताना दिसत आहे. यानंतर दोघेही उठतात आणि पार्श्वभूमीत ‘नाटू-नाटू’ गाणे ऐकू येते.

कॅप्शनमध्ये त्याच्या अश्विनने लिहिले की हा चित्रपट भारताची शान असून तो ऑस्कर जातो आणि देशाचे नाव रोशन करतो. त्यांनी केलेल्या व्हिडिओचे श्रेय सोहम देसाईला जाते. माझ्या वाटी कमिंग रील फेमचा हा भाग आहे. हार्दिक पांड्यानेही या रीलवर टिप्पणी केली आणि हसणारा इमोजी शेअर केला. तत्पूर्वी, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी संपूर्ण संघ ऑस्करमध्ये ‘नाटू-नाटू’ च्या विजयाचा आनंद साजरा करत होता. गावसकर म्हणाले की, “मला खूप आनंद झाला की हे घडले. संपूर्ण RRR टीमचे अभिनंदन. ज्यांनी गाणे तयार केले त्यांचे अभिनंदन. कलाकार उत्कृष्ट होते. मी चित्रपट पाहिला. तो एक उत्तम चित्रपट होता. ते जिंकल्याचा मला खूप आनंद आहे.”

काय घडलं मॅचमध्ये?

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या आणि जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. यानंतर भारतीय संघानेही जवळपास दोन दिवस फलंदाजी करत ५७१ धावा केल्या. त्यानंतरच हा सामना अनिर्णित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून १७५ धावा केल्या. यानंतर कर्णधार आणि सामनाधिकारी दोघांनीही सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत हा सामना नियोजित वेळेच्या जवळपास दीड तास आधी संपला.

हेही वाचा: IND vs AUS: “मी ४०-५० वर…”, विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर राहुल द्रविडने घेतली मुलाखत, पाहा Video

सामना अनिर्णित राहिल्याने, भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ चक्रातील ही भारताची शेवटची मालिका होती. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला होता. आता हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये ७ ते ११ जून दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 15:34 IST