IND vs AUS Viral Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टेस्ट क्रिकेट सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी भारतीयांच्या एका व्हायरल व्हिडीओने आनंदाला गालबोट लावण्याचे काम केले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु असताना स्टेडियममध्ये दोन्ही देशाच्या फॅन्समध्ये बाचाबाची सुरु झाली. काहीच वेळात हे भांडण शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचले. यात नेमकी चूक कोणाची होती हे कळले नाही पण अशाप्रकारे पाहुण्यांचा अपमान करणे हे भारतीयांच्या अतिथी देवो भवः परंपरेला छेद देणारे वागणे आहे असे नेटकरी म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये शिवीगाळ केल्यावर तरुणांनी दिलेल्या घोषणा ऐकून नेटकऱ्यांचा संताप होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारतीय व ऑस्ट्रेलियन तरुणाचे काही कारणावरून वाद सुरु होतात, यावेळी भारतीय तरुण चिडून समोरच्याच्या अंगावर धावून जातो. तिथे उपस्थित असलेले लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तो कोणाचेही ऐकण्याच्या तयारीत नसतो. त्याचा पारा इतका चढतो की तो त्या पाहुण्याला अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सुरुवात करतो.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

@vinodkapri यांनी हा व्हिडिओमध्ये घडलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा असल्याचे म्हणत ट्वीट केलं आहे. तर यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या देशात आलेल्या पाहुण्यांना असं वागवणं चुकीचं असल्याचे म्हणत तरुणावर टीका केली आहे. विशेषतः शिव्या देऊन वर भारत माता की जय म्हणत घोषणा दिल्याने नेटकऱ्यांनी या ग्रुपची चांगलीच शाळा घेतली आहे.

IND vs AUS व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांना या तरुणांवर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. सलग दोन पराभवांनंतर कसोटी क्रिकेटमधील नंबर १ चा मुकुट भारताने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावण्यात आला आहे. मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.