IND VS AUS Highlights: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या टेस्ट क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन अव्वल फलंदाजांना टीम इंडियाने धूळ चारली. भारताने पहिल्या डावात ४०० धावा करून २२३ धावांची मोठी आघाडी घेतली. रोहित शर्माने शानदार शतक झळकावून चांगली सुरुवात करून दिली होतीच पण विशेष म्हणजे भारताच्या खालच्या फळीतील म्हणजेच गोलंदाजांकडून सुद्धा तुफान फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी आपापल्या अर्धशतकांचा खेळ केला. दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

सरतेशेवटी, मोहम्मद शमीनेही तीन षटकार आणि दोन चौकारांसह 10 व्या क्रमांकावर खेळूनही संघासाठी 37 महत्त्वपूर्ण धावा आणल्या. दरम्यान, भारताच्या विजयानंतर संघाच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताच्या सेलिब्रेशनमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक खास डान्स व्हायरल होत आहे. शाहरुख खानच्या पठाण सिनेमातील झुमे जो पठाण या गाण्यावर कोहली मैदानातच थिरकताना दिसत आहे. विराटने एक दोन स्टेप करताच जडेजाही त्याला साथ देऊ लागला आणि दोघेही सीमारेषेजवळ मजा करताना दिसले.

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: रजत पाटीदारच्या गगनचुंबी षटकाराने विराटही झाला अवाक्, कोहलीच्या भन्नाट प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत

IND vs AUS नंतर झुमे जो कोहली!

ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात ९१ धावांत सर्वबाद झाला. रविचंद्रन अश्विनने (5/37) पाच बळी घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सहा फलंदाजांपैकी पाच फलंदाजांना बाद केले आहे. रोहित आणि त्याच्या खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरायचे असेल तर ही मालिका खूप महत्त्वाची आहे. त्यांना ३-० किंवा ३-१ अशा फरकाने मालिका जिंकायची आहे. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली आहे.