Wasim Jaffer Meme Tweet on Cameron Green: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसऱ्या टी-२० सामन्यामध्येही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सलामीवीर कॅमरॉन ग्रीनने तुफान फटकेबाजी केली. कॅमेरॉन ग्रीनने केलेली सुरुवात पाहता ऑस्ट्रेलियन संघ भारताला २०० हून अधिक धावांचं लक्ष्य देईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र फिरकी गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी करत सामन्यावर भारताला पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियन संघाला १८६ धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. मात्र या सामन्यामध्येही ग्रीनने २१ चेंडूंमध्ये ५२ धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ग्रीनचा झेल के. एल. राहुलने पकडला. मात्र ग्रीनची फलंदाजी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने आगामी आयपीएलसंदर्भात एका मिमच्या आधारने भन्नाट भाकित केलं आहे.

नक्की पाहा >> Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टॅम्प उडाला तरी मॅक्सवेल Runout देण्यात आलं; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण

वसीम जाफर हा त्याच्या मिम्स आणि ट्वीटरवरील हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. सामन्यांदरम्यान भन्नाट पोस्ट करणारा जाफर हा नेटकऱ्यांचा लाडका आहे. क्रिकेट कारकिर्दीमध्ये काहीसा दुर्लक्षित राहिलेला जाफर हा सध्या ट्वीटरवर ट्रेण्डींगही असतो. असेच एक ट्वीट त्याने आज कॅमरॉन ग्रीनबद्दल केलं आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी करणाऱ्या या २३ वर्षीय फलंदाजाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिसऱ्या सामन्यामध्ये १९ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरं करणाऱ्या ग्रीनने पहिल्या दोन सामन्यांमध्ये उत्तम फलंदाजी केली होती.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

नक्की पाहा >> Ind vs Aus: अक्षरने स्वत:च्याच गोलंदाजीवर पकडला ‘वेड’ लावणारा कॅच; तुफान फॉर्ममधील वेडच्या विकेटचा Video पाहाच

ग्रीनने भारताविरोधात टी-२० मध्ये सर्वात जलद ५० धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू हा विक्रम आपल्या नावे करुन घेतल्यानंतर वसीम जाफरने ट्वीटरवरुन मिर्झापूरमधील एका सीनमधील मिम शेअर केलं आहे. या फोटोवर, “हम को जॉइन कर लो” असं वाक्य लिहिलेलं आहे. या मिमला कॅप्शन देताना जाफरने, “या डिसेंबरमध्ये सर्व आयपीएलचे संघ कॅमरॉन ग्रीनला काय म्हणतील” असं मजेदार वाक्य लिहिलं आहे. जाफरचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने या सामन्यात तीन बळी घेतले. या मालिकेमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरलेल्या अक्षरने मालिकेतील १० षटकांमध्ये ६३ धावांच्या मोबदल्यात आठ गडी बाद केले. या कामगिरीचं अनोख्या पद्धतीने कौतुक करताना जाफरने अक्षर पटेलचा हसणारा फोटो शेअर करत, “पुढील वर्षी बॉर्डर-गावस्कर चषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येत असल्याचं तुम्हाला समजतं जेव्हा” अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, केवळ जाफरच नाही तर अनेकांनी आयपीएलमध्ये ग्रीनला उत्तम बोली मिळेल असा अंदाज व्यक्त करणारे मिम्स शेअर केले आहेत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

मोहालीमधील पहिल्या टी-२० सामन्यात ग्रीनने ३० चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. मात्रा तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा त्याने तुफान फलंदाजी केल्याने आता आयपीएलमध्ये त्याला किती बोली लागते याबद्दल आतापासून उत्सुकता दिसून येत आहे.