इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामनाही तीन दिवसांत संपला आणि या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीच्या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केले. इंदोरच्या खेळपट्टीवर सातत्याने टीका करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंवरही रोहितने जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन, मार्क वॉ आणि मायकेल क्लार्क यांना इंदोरची खेळपट्टी पाहून अजिबात आनंद झाला नाही आणि त्यांनी ही खेळपट्टी कसोटी खेळण्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले.

रोहित म्हणाला, “माजी क्रिकेटपटूंना या खेळपट्ट्यांवर खेळावे लागले नाही. त्यामुळे मला माहीत नाही. मी म्हटल्याप्रमाणे, हीच खेळपट्टी आहे ज्यावर आम्हाला खेळायचे होते आणि हीच आमची ताकद आहे, जेव्हा तुम्ही घरच्या मैदानावर खेळता तेव्हा तुम्हाला तुमच्या ताकदीनुसार खेळायचे असते आणि बाहेरचे लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. आणि निकाल मिळाला नसता तर वेगळा विचार केला असता.”

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

हेही वाचा: IND vs AUS: “भारतीय संघाला अतिआत्मविश्वास नडला!” भारताचे माजी प्रशिकाकडून टीम इंडियाची कानउघडणी

रोहित पुढे म्हणाला, “मला समजत नाही की खेळपट्टीवर एवढी चर्चा का होत आहे. जेव्हा आम्ही भारतात खेळतो तेव्हा फक्त खेळपट्टीवर लक्ष केंद्रित केले जाते, लोक मला प्रश्न का विचारत नाहीत की नॅथन लायनने गोलंदाजी कशी केली? दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने एवढी शानदार खेळी खेळली की उस्मान ख्वाजा पहिल्या डावात कशी फलंदाजी करतो? मी या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे देऊ शकतो, खेळपट्टीबद्दल नाही, कारण माझ्या मते ते आवश्यक नाही.”

भारतीय संघाने मागच्या १० वर्षात मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये केलेले प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. मार्च २०१३ पासून आतापर्यंत भारताने मागदेशातील ४३ कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी फक्त ३४ सामने संघाने जिंकले आहेत. ६ सामने अनिर्णित राहिले असून अवघ्या तीन सामन्यांती भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या तीन सामन्यांतील एक म्हणजेच १ मार्च रोजी सुरू झालेला इंदोर कसोटी सामना. यापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला असताना पुणे कसोटी सामन्यात पाहुण्यांनी भारताला पराभूत केले होते. त्यानंतर २०२१ साली इंग्लंडविरुद्ध चेन्नईत खेळलेल्या कसोटी सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. मायदेशातील मागच्या १० वर्षातील तिसरा पराभव भारताला शुक्रवारी पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाला. यादरम्यानच्या काळात भारत फक्त ऑस्ट्रेलियाकडून दोन वेळा पराभूत झाला आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “भारतीय गोलंदाज मेहनत नसून मजुरी…” हरभजन सिंगची रोहित शर्मावर सडकून टीका

मागच्या १० वर्षात भारताला भारतातील कसोटी सामन्यात पराभूत करणारे संघ

२०१७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पुणे)

२०२१ विरुद्ध इंग्लंड (चेन्नई)

२०२३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (इंदोर)