Rohit Sharma on Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. हा तोच सूर्या आहे ज्याने टी२० मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, पण एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरच्या जागी ३२ वर्षीय सूर्यकुमार यादवला संधी मिळाली. पण सलग दोन वनडेत सूर्या फ्लॉप ठरला. पहिल्याच चेंडूवर तो विकेट गमावत आहे. दोन्ही वेळा मिचेल स्टार्कने इनस्विंग चेंडूवर सूर्याला विकेटसमोर पायचीत केले. सोशल मीडियावर लोक सूर्यकुमार यादवऐवजी संजू सॅमसनला संघात संधी देण्याच्या चर्चा करत आहेत. मात्र, या कठीण काळात सूर्याला कर्णधार रोहित शर्माची साथ लाभली आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला असला तरी आगामी सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला पुरेशी संधी दिली जाईल, असे त्याने म्हटले आहे. कर्णधार म्हणतो की, “सूर्याला माहित आहे की त्याला चांगली कामगिरी करायची आहे आणि संघ व्यवस्थापन त्याला वारंवार संधी देईल. पण यानंतर आता म्हणू नका पुरेशी संधी दिली नाही. सगळ्यांना आम्ही योग्य संधी देत असतो. जो अपयशी ठरतो त्याला आम्ही पाठिंबा देतो. बाहेर देखील अनेक खेळाडू आहेत जे संघात येण्याची वाट पाहत आहेत. त्यांनाही लवकरच संधी मिळेल असे तो म्हणाला.”

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

हेही वाचा: IND vs AUS ODI: इशान की राहुल? या वादावर कर्णधार हार्दिकने टाकला पडदा! आता शुबमन गिलबरोबर ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकला नाही, दोन्ही सामन्यांमध्ये त्याला मिचेल स्टार्कने गोल्डन डकवर बाद केले. शेवटच्या १६ एकदिवसीय डावांमध्ये, त्याने आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही, त्याची सर्वोत्तम धावसंख्या न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ३४ आहे. हा खराब फॉर्म असूनही सूर्यकुमार यादवला संधी दिल्याबद्दल रोहित पुढे म्हणाला की. “श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही. त्यांची जागा रिक्त आहे, त्यामुळे आम्ही सूर्याला मैदानात उतरवू. जर आणखी कोणाची गरज भासल्यास त्याला देखील संधी देण्यात येईल.” संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांचे नाव न घेता त्याने “या दोघांच्या बाबतीत संघ व्यवस्थापन विचार करत आहे असे तो म्हणाला.”

कर्णधार रोहित पुढे म्हणाला, “गेल्या दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला, पण त्याला अधिक सेट होण्यासाठी सलग सात-आठ किंवा दहा सामने द्यावे लागतील. सध्या त्याला कोणी दुखापत झाल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संधी मिळत आहे. संघ व्यवस्थापनाचे काम खेळाडूंना संधी देणे आहे आणि जेव्हा त्यांना वाटत असेल की ते सोयीस्कर नाहीत किंवा धावा होत नाहीत, तेव्हा ते याचा विचार करतील. सध्या आपण त्या मार्गावर नाही आहोत.”

हेही वाचा: WPL 2023, GG-W vs DC-W: गुजरातचे स्पर्धेतील आव्हान कायम! अटीतटीच्या सामन्यात दिल्लीवर केली ११ धावांनी मात

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर संपूर्ण भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि अवघ्या २६ षटकात ११७ धावांवर गारद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ बळी घेतले. हे सोपे लक्ष्य पाहुण्यांनी एकही विकेट न गमावता अवघ्या ११ षटकांत पूर्ण केले. तीन सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे.