scorecardresearch

Premium

IND vs AUS, World Cup: विश्वचषकात भारताची विजयी सलामी! विराट-राहुलच्या दमदार खेळीपुढे ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे, सहा विकेट्सने शानदार विजय

IND vs AUS, World Cup: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

IND vs AUS: India's winning start in the World Cup defeating Australia by six wickets Rahul ended the match with a six
विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाचवा सामना यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ १९९ धावांत लोटांगण घातले. त्यानंतर भारताची सुरुवात खूपच खराब झाली असती. दोन धावांवर तीन विकेट्स अशी असताना विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी अडचणीतून बाहेर काढत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या दोघांनी १६५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेले. यानंतर राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार चौकार-षटकार मारून लवकर सामना संपवला. सहा गडी राखून भारताने या स्पर्धेचा विजयाने श्री गणेशा केला आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला

भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे. भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.

IND vs ENG 4th Test Match Updates in marathi
IND vs ENG 4th Test : इंग्लंडला मोठा धक्का! ‘या’ स्टार गोलंदाजाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून घेतली माघार
loksatta analysis why india lost world cup final against australia
ऑस्ट्रेलिया ३ – भारत ०… विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये भारत ऑस्ट्रेलियासमोर का ढेपाळतो?
Indian u 19 cricket team skipper uday saharan
U19 WC Final : “आमची तयारी चांगली होती, पण..”, पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची प्रतिक्रिया
IND vs AUS U19 icc
IND vs AUS ICC U19 WC : भारताची ‘आदर्श’ झुंज अपयशी, विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं; ऑस्ट्रेलिया ठरली अव्वल!

काय घडलं मॅचमध्ये?

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने ६९ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. वॉर्नरने ४१ धावा केल्या. स्मिथ आणि लाबुशेनने ३६ धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला ४६ आणि लाबुशेनला २७ धावांवर बाद केले. त्यांनी अ‍ॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. १५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. लवकरच ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स १५ धावा करून बाद झाला तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस मिचेल स्टार्कने २८ धावा करत संघाची धावसंख्या १९९ धावांपर्यंत नेली. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी कॅप्टन रोहित झाला भावूक; म्हणाला, “भारतीय खेळाडू होणे सोपे…”

२०० धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. दोन धावांवर तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. स्टार्कने इशान किशनला तर हेजलवूडने रोहित आणि श्रेयसला आपला बळी बनवले. यानंतर राहुलसह कोहलीने डावाची धुरा सांभाळली. त्याला १२ धावांवर जीवदान मिळाले. यानंतर दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. दोघांनी आपापली अर्धशतकं झळकावली आणि शतकी भागीदारी केली. यानंतरही तो क्रीजवरच राहिला. कोहलीचे शतक हुकले आणि ८५ धावांवर तो हेजलवुडचा तिसरा बळी ठरला. यानंतर राहुलने हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. मात्र, त्याचे शतकही हुकले आणि ९७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियातर्फे हेजलवूडने तीन आणि स्टार्कने एक विकेट घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus world cup virat rahul excellent half centuries australias flop shows indias resounding victory by six wickets avw

First published on: 08-10-2023 at 22:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×