scorecardresearch

Premium

IND vs AUS WTC Final: “मी इतकी चांगली…”; अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल एबी डिव्हिलियर्सच मोठं वक्तव्य

India vs Australia WTC Final Updates: डब्ल्यूटीसी फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावून भारतीय संघाचा पहिला डाव सावरला. या अर्धशतकानंतर अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सने रहाणेच्या तंत्रांची स्तुती केली.

AB de Villiers praises Ajinkya Rahane's innings
एबी डिव्हिलियर्स आणि अजिंक्य रहाणे (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

AB de Villiers saya I have never seen Ajinkya Rahane move so well: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार प्रदर्शन केले होत. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. परंतु तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर आणि रवींद्र जडेजाने उत्कृष्ट कामगिरी करत भारताचे सामन्यात पुनरागमन केले. भारताच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे सर्वाधिर ८९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर एबी डिव्हिलियर्ससह अनेकांनी रहाणेचे कौतुक केले.

अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळलेल्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने अजिंक्य रहाणेच्या तंत्राचे कौतुक केले आहे. त्याने ट्विट करून रहाणेच्या तंत्राचे कौतुक केले आणि सांगितले की, रहाणे इतका चांगला मूव्ह करत असल्याचे मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रहाणेने कठीण काळात शानदार खेळी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येसमोर भारताचा फॉलोऑन टाळण्यात मोलाची भूमिका बजावली. तो शतकापासून हुकला पण त्याने ८९ धावांची शानदार खेळी खेळली ज्यात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या आणि शार्दुल ठाकूर (५१) यांच्यातील १०९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: बोटाच्या दुखापतीने त्रस्त अजिंक्य रहाणे, दुसऱ्या डावात फलंदाजी करणार की नाही? स्वत:च दिली अपडेट

एबी डिव्हिलियर्सकडून अजिंक्य रहाणेचे कौतुक –

अजिंक्य रहाणेच्या तंत्राबाबत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्या ट्विटला एबी डिव्हिलियर्सने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी अजिंक्य रहाणेला इतकी चांगली हालचाल करताना कधीच पाहिले नाही. त्याचे तंत्र जबरदस्त आहे आणि तो उशीरा खेळत आहे.”

माजी क्रिकेटर आकाश चोप्रानेही अजिंक्य रहाणेच्या तंत्रावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “अजिंक्य रहाणेने आपले तंत्र थोडे बदलले आहे. त्याचे दोन्ही पाय क्रीजच्या आत आहेत, तो उशिरा खेळत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण तो अजिबात पुढे जात नाही. मी ५०-५० टक्के त्याच्यासोबत आहे. पण मला १०० टक्के खात्री नाही की खेळण्याचा हा योग्य मार्ग आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 15:42 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×