IND vs AUS Yashasvi Jaiswal got stuck in a glass door : भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील दुसरा कसोटी ६ डिसेंबरपासून खेळला जाणारा आहे. या सामन्यात भारतीय संघ अॅडलेडला रवाना झाला. मात्र, विमानतळावर युवा सलामी फलंदाज यशस्वी जैस्वाल प्रतिबंधित क्षेत्रात गेल्यावर काचेच्या दारात अडकला, तेव्हा शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने त्याला मदत करण्याऐवजी त्याची मजा केली. ज्याचा व्हिडीओ बीसीसीायने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता आणि आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी संपल्यानंतर, भारतीय संघ कॅनबेरा येथे दोन दिवसीय दिवस-रात्र सराव सामना खेळला आणि २ डिसेंबर रोजी संघ कॅनबेराहून ॲडलेडला पोहोचला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

रोहित-गिलने घेतली यशस्वीची मजा –

यादरम्यान यशस्वी जैस्वाल काचेच्या दारात कैद झाला. यानंतर शुबमन गिल आणि रोहितने त्याची मजा घेतली. शुबमन गिल म्हणाला की, ‘तेथे जाऊ नका’, असे लिहिले देखील नाही. यावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘आता तो अडकला.’ यावेळी यशस्वीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही टीम इंडियाच्या ट्रॅव्हल डेची झलकही पाहू शकता, जिथे वॉशिंग्टन सुंदर टोपी खरेदी करताना दिसला.

हेही वाचा – U-19 Asia Cup 2024 : नेपाळच्या गोलंदाजाला विकेट घेतल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन करणं पडलं महागात, VIDEO होतोय व्हायरल

ॲडलेड कसोटी सामना हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळला जाणार आहे. या सामन्यातून कर्णधार रोहित आणि शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये परततील. दोघेही पर्थ कसोटी सामना खेळू शकले नव्हते. रोहित १५ नोव्हेंबरला दुसऱ्यांदा वडील झाला आणि त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता आणि त्याच्या जागी जसप्रीत बुमराहने संघाची धुरा सांभाळली, तर दुसरीकडे शुबमन गिल बोटाच्या दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. मात्र, तो दुसऱ्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होता आणि त्याने दोन दिवसीय सराव सामन्यात अर्धशतक झळकावले.

Story img Loader