IND vs AUS Mohammad Kaif on Rohit Sharma : टीम इंडिया आपला नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय सिडनी कसोटी सामना खेळत आहे. रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याबद्दल चाहते आणि माजी खेळाडू सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचवेळी आता माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफने रोहित शर्मावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, रोहित शर्मा पाचव्या कसोटीचा भाग नाही. हा निर्णय कोणाचा आहे हे मला माहीत नाही. पण हा निर्णय योग्य नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद कैफ काय म्हणाला?

माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ म्हणाला, “रोहित शर्मा पाचव्या कसोटीचा भाग नाही. हा निर्णय कोणाचा आहे हे मला माहीत नाही. स्वतः रोहित शर्मा, गौतम गंभीर, संघ व्यवस्थापन किंवा निवड समिती, पण हा निर्णय योग्य नाही. तुम्ही तुमच्या सर्वोत्तम कर्णधाराला वगळले आहे. रोहित शर्मा हा काही सामान्य कर्णधार नाही. तरुण खेळाडूंना घेऊन त्यांनी संघ तयार केला आणि युवा खेळाडूंना सतत पाठबळ दिले.”

कोहली आणि ख्वाजासारख्या फलंदाजांनीही धावा केल्या नाहीत –

माजी खेळाडू पुढे म्हणाला की, “कर्णधार म्हणून विश्वचषक जिंकून तुम्हाला बऱ्याच दिवसांनी आनंद साजरा करण्याची संधी दिली होती, पण तुम्ही त्याला वगळले. तेही इतक्या महत्त्वाच्या सामन्यासाठी, हा निर्णय योग्य नाही. कोहली आणि ख्वाजासारख्या फलंदाजांनीही धावा केल्या नाहीत. त्यामुळे धावा न करण्यात एकटा रोहित शर्मा अपयशी ठरलेला नाही. अशा सीमिंग विकेटवर फलंदाजी करणे सोपे नाही.”

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीची सुरूवातही अपघाताने अन् शेवटही, पदार्पण ३ वर्ष का गेलं होतं लांबणीवर? वाचा सविस्तर

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “रोहित शर्माने सिडनी कसोटीत खेळायला हवे होते. माझी इच्छा आहे की त्याने प्लेइंग इलेव्हनचा भाग असायला हवे होते. त्याने जैस्वालसह सलामी दिली असती आणि भारतीय संघाला कसोटी जिंकण्यात मदत केली असती. जर रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनचा भाग बनून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम ठेवली असती, तर तो सन्माननीय निरोप ठरला असता. माझा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या कर्णधारासोबत जायला हवे होते, कोणीही धावा करत नाही, तुम्ही तुमच्या कर्णधारासोबत हरायला किंवा जिंकायला हवे होते. रोहित शर्माने सिडनी कसोटीत खेळायला हवे होते, असे माझे वैयक्तिक मत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus you cannot drop your captain mohammad kaif slams after rohit sharma not playing sydney test vbm