Mehidi Hasan Miraj said I told Mustafizur Rahman to keep calm and play 20 balls | Loksatta

IND vs BAN 1st: मेहिदी हसन मिराजचा विक्रमी भागीदारी बाबत मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी फक्त मुस्तफिझुरला…’

मेहिदी आणि मुस्तफिझूरने दहाव्या विकेट्साठी विक्रमी भागीदारी केल्याने बांगलादेशवर १ गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

IND vs BAN 1st: मेहिदी हसन मिराजचा विक्रमी भागीदारी बाबत मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी फक्त मुस्तफिझुरला…’
मेहिदी हसन मिराज आणि मुस्तफिजुर रहमानची विक्रमी भागीदारी.(संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि बांगलादेश संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी पार पडला. थरारक झालेल्या या सामन्यात बांगलादेश भारताचा १ विकेट राखून पराभव केला. मेहिदी हसन मिराज आणि मुस्तफिझुर रहमान यांनी १० व्या विकेटसाठी नाबाद ५१ धावांची विक्रमी भागीदारी केली. ज्याच्यावर बांगलादेशने भारतावर शानदार विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सामन्यानंतर बोलताना मेहिदी हसन मिराजने मुस्तफिजुर रहमान दिलेल्या मंत्राचा खुलासा केला.

४० व्या षटकात बांगलादेशची धावसंख्या १२८/४ वरून १३६/९ झाली होती. महमुदुल्लाह आणि मुशफिकुर रहीम हे सलग चेंडूंमध्ये बाद झाले होते. तेव्हा भारता बांगलादेशविरुद्ध सामना सहज जिंकणार असे दिसत होते. मात्र मुस्तफिजुर रहमानने मेहिदी हसन मिराजला उत्कृष्ट साथ दिली. रहमानने नाबाद १० धावा केल्या, ज्यामध्ये त्याने दोन चौकार लगावले. त्याचबरोबर महेदीने नाबाद ३८ धावांच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार खेचून बांगलादेशचे सामन्यात शानदार पुनरागमन केले.

सामन्यानंतर बोलताना मेहिदी हसन मिराज म्हणाला, ”अल्लाहचे आभार मानतो. मी खरोखर आनंदी आणि उत्साही आहे. मुस्तफिझूर आणि मला वाटले की आम्हाला विश्वास करण्याची गरज आहे. मी त्याला (मुस्तफिझूर) शांत राहा आणि २० चेंडू खेळ असे सांगितले होते. मी फक्त एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि त्या रणनीतीवर विश्वास ठेवण्याचा विचार करत होतो.”

सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा मेहिदी म्हणाला, ”मी गोलंदाजीचा खरोखर आनंद घेत आहे (नऊ षटकात १/४३). मी चेंडूने विकेट घेण्याचा प्रयत्न केला. मला गोलंदाजी आवडते. ही कामगिरी माझ्यासाठी खरोखरच संस्मरणीय आहे.”

हेही वाचा – FIFA World Cup 2022: इंग्लंडचा सेनेगलवर इंग्लंड दमदार विजय; आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सची लढत

भारतीय संघाला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका –

शेवटच्या सहा षटकांमध्ये भारताने बरेच झेल सोडले. तसेच खराब क्षेत्ररक्षण, ओव्हरथ्रो आणि खराब गोलंदाजीमुळे भारत दडपणाखाली आला. ज्यामुळे मेहिदी आणि मुस्तफिझूर यांचा आत्मविश्वास वाढवल्याने त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांना १-० अशी आघाडी मिळवून देण्यासाठी शेवटच्या विकेटसाठी झुंजार भागीदारी केली.

हेही वाचा – IND vs BAN 1st ODI: शाकीब अल हसनचा झेल घेत विराट कोहलीने केली सव्याज परतफेड

मेहिदी आणि मुस्तफिझूरची दहाव्या विकेट्साठी विक्रमी भागीदारी –

मेहिदी आणि मुस्तफिझूर यांच्यातील ५१ धावांची भागीदारी ही बांगलादेशसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील दहाव्या विकेटसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना दहाव्या विकेटसाठी ही चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली. बांगलादेशचे चाहते आणि खेळाडू पुढची अनेक वर्षे बोलतील असा हा सामना होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 09:57 IST
Next Story
FIFA World Cup 2022: इंग्लंडचा सेनेगलवर दमदार विजय; आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सशी होणार सामना