Shakib Al Hasan became the first Bangladesh bowler to dismiss Rohit and Virat in the same over | Loksatta

IND vs BAN 1st ODI: रोहित-विराटला बाद करत शाकिबने केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज

भारत आणि बांगलादेश संघातील पहिला वनडे खेळला जात आहे. या सामन्यात शाकिब अल हसनने रोहित-विराटला एकाच षटकात बाद एक मोठा पराक्रम केला आहे.

IND vs BAN 1st ODI: रोहित-विराटला बाद करत शाकिबने केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज
शाकिब अल हसनने रोहित-विराटला एकाच षटकत बाद केले (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना मीरपूर येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने ४१.२ षटकांत सर्वबाद १८६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशला १८७ धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान या सामन्यात शाकिब अल हसने रोहित आणि विराटला बाद करत एक मोठा पराक्रम केला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक गमावून फलंदाजी करताना शिखर धवनच्या (७) रूपाने संघाला पहिला धक्का बसला. तो डावाच्या सहाव्या षटकात बाद झाला. तेव्हा धावफलकावर केवळ 23 धावा झाल्या होत्या. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज शकिब अल हसनने पहिल्यांदा रोहितला बाद केले. त्यानंतर लगेच त्याच षटकात विराटला बाद केले. त्यामुळे भारतीय संघाला एकाच षटकात दुहेरी झटका बसला.

बांगलादेशच्या डावातील ११वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाकीबने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ३ चेंडूतच तंबूत पाठवले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाकिबने रोहितला त्रिफळाचित केले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने विराटला एक्स्ट्रा कव्हरवर लिटन दासकडे झेलबाद केले. रोहितला २७ तर विराटला फक्त ९ धावा करता आल्या. शाकीबच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने ४९ धावांत ३ विकेट गमावल्या.

शाकीबने दुसऱ्यांदा केला हा पराक्रम –

हेही वाचा – T10 League 2022: आंद्रे रसेलने केला कहर; केवळ ११ चेंडूत कुटल्या ५२ धावा, पाहा व्हिडिओ

शाकिब अल हसनने विराट कोहली आणि रोहित शर्माला एकाच षटकात बाद करत वनडेत दुसऱ्यांदा ही कामगिरी केली. यापूर्वी २०१० मध्ये आशिया चषकाच्या एका सामन्यात त्याने १५ व्या षटकात ही कामगिरी केली होती. वनडे फॉरमॅटमध्ये रोहित आणि कोहलीला एकाच षटकात दोनदा बाद करणारा शाकिब हा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिबने ३६ धावांत ५ बळी घेतले. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ७३ धावा केल्या. तसेच ७ फलंदाज दुहेरी आकडा देखीव गाठू शकले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:39 IST
Next Story
Lakshya Sen: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन विरोधात गुन्हा दाखल