IND vs BAN Test Match: पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने ऋषभ पंतच्या तंदुरुस्तीबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे. भारताचा यष्टीरक्षक व फलंदाज ऋषभ पंतच्या वजनावरून सलमानने कमेंट केली आहे. चट्टोग्राम येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचे विश्लेषण करताना बट यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर ही टिप्पणी केली. यावरून आता ऋषभ पंतच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींनी सलमान बटच्या विधानाला अनुमोदन दिलं आहे.

ऋषभ पंत कसा बाद झाला?

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याच्या भारताच्या पहिल्या डावात पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. भारतीय संघ आधीच कर्णधार केएल राहुल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या विकेट्स केवळ ४८ धावांवर गमावल्यामुळे अडचणीत होता. अशावेळी ऋषभकडून उत्तम खेळीच्या अनेकांना अपेक्षा होत्या. एकीकडे तैजुल इस्लामच्या डावखुऱ्या फिरकीसमोर भारतीय खेळाडू धडपडत होते, पण पंत आला आणि त्याने बांगलादेशच्या फिरकीपटूंच्या आक्रमणाचा सामना करत त्याने डाव पलटण्यास सुरुवात केली. ऋषभ पंत आता मोठी खेळी खेळणार असे वाटत असतानाच ऑफस्पिनर मेहदी हसन मिराझने पंतला ४६ धावांवर बाद केले.

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण

काय म्हणाला सलमान बट?

याच सामन्याचे विश्लेषण करताना सलमान बट म्हणाला की, “ऋषभ पंत त्याच्या पद्धतीने उत्तम खेळत होता, पण तो काहीतरी वेगळं करायचं म्हणून तो शॉट मारायला गेला आणि चेंडू स्टंपला धडकण्यापूर्वी बॅटला, पॅडवर आदळल्याने तो विचित्र बाद झाला. मी नेहमी ऋषभ पंतच्या फिटनेसवर बोलतो कारण तो वेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळण्यात अपयशी ठरतो कारण शरीर त्याला साथ देत नाही. मला वाटतं ऋषभ पंतचं वजन जास्त आहे त्यामुळे तो फारसा चपळ नाही. ऋषभ पंतचे वजन कमी झाल्यास व तो थोडा फिट झाल्यास त्याची चपळता वाढेल व तो नाविन्यपूर्ण शॉट्स खेळण्यास यशस्वी ठरेल”.

हे ही वाचा<< IND vs BAN 1st Test: कुलदीपने चट्टोग्राममध्ये फडकवला आपल्या नावाचा झेंडा; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याचे हायलाईट्स

दरम्यान, पंत बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (९०) आणि श्रेयस अय्यर (८६) यांनी मिळून भारताला चांगल्या स्कोअर पर्यंत नेले होते. अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (५८) आणि कुलदीप यादव (४०) यांनी भारताची धावसंख्या ४०४ पर्यंत नेली होती. दुसरीकडे गोलंदाज कुलदीप यादव ने ४० धावा देत ५ विकेट्स व मोहम्मद सिराज २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या व बांगलादेशचा डाव अवघ्या १५० धावांत आटोपला.