भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (७ डिसेंबर) खेळला गेला. मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. उभय संघांतील पहिला एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारताला कडवे आव्हान देत विजय मिळवला होता. मालिकेतीत दुसऱ्या सामन्यात देखील त्यांच्याकडून चाहत्यांना अशाच प्रदर्शनाच्या अपेक्षा होता. भारतीय गोलंदाज बुधवारी कसलेली गोलंदाजी केली, मात्र मेहदी हसन आणि महमुदुल्लाह यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे बांगलादेश संघाने २७१ धावांपर्यंत मजल मारली.

तत्पूर्वी, सामना सुरु होण्याआधी सामन्यातील नाणेफिकीचे अपडेट देताना आयसीसीच्या ट्विटर अकाउंटवर एक मोठी चूक केली. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोठा गोंधळ दिसला. मॅचच्या टॉसचे अपडेट देताना आयसीसीच्या ट्विटर अकाउंटवर एक मोठी चूक दिसली, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी आयसीसीला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली.

not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
MS Dhoni removed his helmet when fans asking for it
चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?

आयसीसीने टॉस अपडेट देताना पोस्ट केलेला फोटो कॅनडाच्या क्रिकेट संघाचा फोटो होता. लोकांनी या ट्विटची लगेच दखल घेतली आणि ते शेअर करून आयसीसीला ट्रोल करायला सुरुवात केली. काही वेळाने आयसीसीलाही त्यांची चूक समजली आणि त्यांनी त्यांची पोस्ट हटवली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि लोकांनी त्या ट्विटचा स्क्रीनशॉट घेतला होता. आयसीसी ट्रोलिंग सुरूच आहे. अलीकडेच, महिला क्रिकेटपटूंसाठी बनवलेल्या पोस्टच्या खाली पुरुष क्रिकेटपटूंची नावे लिहिण्यात आल्याने आयसीसीच्या बाजूने आणखी एक त्रुटी दिसून आली.

मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला. भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या बांगलादेशसाठी त्यांचे सलामीवीर फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. सलामीला आलेला अनामुल हक आणि लिटन दार यांनी अनुक्रमे ११ आणि ७ धावांची खेळी केली. महमदुल्लाह याने ७७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर मेहदी हसन मिराज याने पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवली. हसनने बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा केल्या.

हेही वाचा: FIFA WC 2022: “लाजिरवाणा प्रकार!” रोनाल्डोला वगळल्याने त्याची गर्लफ्रेंड पोर्तुगालच्या व्यवस्थापनावर भडकली

सध्या भारतीय संघ पडझडीनंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरला आहे. दीडशेपार टीम इंडियाची धावसंख्या झाली असून दोन्ही हळूहळू बांगलादेशच्या धावसंख्यानजीक पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. अय्यरचे अर्धशतक झाले असून दोघांची भागीदारी देखील १००ची झाली आहे. जर विकेट पडली नाही तर हा सामना भारत जिंकू शकतो.