बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. ०४ डिसेंबर) पार पडला. हा सामना बांगलादेशने आपल्या नावावर केला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. ०७ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. तत्पूर्वी ११ वाजता नाणेफेक पार पडली. यावेळी बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कुलदीप सेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, मात्र त्याच्या पाठीत जडपणा आल्याने उमरानला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या वेगानं मैदानात सर्वानांच मंत्रमुग्ध केले. बांगलादेशच्या डावातील १२वे षटक टाकण्याची जबाबदारी उमरान मलिककडे आली. उमरानने पहिले षटक निर्धाव टाकले. या षटकात त्याचा एक बाउन्सर चेंडू शाकीब अल हसनच्या हेल्मेटमध्ये वेगाने गेला.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

उमरानचे पहिले षटक पाहून तो बांगलादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणणार असल्याचे समजले. आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उमरानने सेटचा फलंदाज नजमुल हुसेन शांतोला बाद केले. ज्या चेंडूवर शांतो क्लीन बोल्ड झाला तो उमरानने १५१ किमी प्रतितास वेगाने टाकला आणि चेंडू थेट स्टंपच्या बाहेर गेला. शांतोला काही कळेपर्यंत तो बाहेर पडला होता. उमरानचा हा चेंडू दाखवतो की हा गोलंदाज आपल्या वेगाशी तडजोड न करता लाईन आणि लेन्थवर मेहनत घेत आहे.

हेही वाचा:   IND vs BAN 2nd ODI: “ही काय संगीतखुर्ची आहे का…” महिला भारतीय संघाची माजी कर्णधारने संघ व्यवस्थापनावर केली टीका

सिराजने पुढच्याच षटकात अनामुलला पायचीत केले खरे, परंतु रोहितच्या दुखापतीने सर्वांचे टेंशन वाढलेय. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार रोहितला हाताचा स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. लोकेश राहुल प्रभारी कर्णधार म्हणून काम पाहतोय.. सिराजने बांगलादेशचा कर्णधार लिटन दास ( ७) याचा त्रिफळा उडवला. नजमूल शांतो (२१) व शाकिब अल हसन (८) ही जोडी सेट होताना दिसत होती, परंत वॉशिंग्टन सुंदरने त्यांना माघारी पाठवले. सुंदरच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा शाकिबचा प्रयत्न फसला.. सिराज व धवन झेल घेण्यासाठी पुढे आले अन् त्यांच्यात ताळमेळ चूकला… शाकिबला जीवदान मिळलाय असे वाटत असताना धवनने चेंडू मांडीच्या सहाय्याने टिपला अन् सुंदरच्या जीवात जीव आला. बांगलादेशचे ६ फलंदाज १७६ धावांत माघारी परतले आहेत. महमुदुल्ला आणि मेहदी हसन यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली आहे.