IND vs BAN Adam Gilchrist on Rishabh Pant Comeback : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने कार अपघातानंतर २० महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले. तो नोव्हेंबर २०२२ नंतर तो थेट सप्टेंबर २०२४ मध्ये कसोटी क्रिकेट खेळायला आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, त्याचा एक भयानक कार अपघात झाला होता. आता त्याच्या पुनरागमनावर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने त्याचे कौतुक करताना मोठं वक्तव्य केले आहे.

ॲडम गिलख्रिस्टचे ऋषभबद्दल मोठं वक्तव्य –

क्लब पेरियार फायर पॉडकास्टमध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला, “इतिहासातील सर्वात महान पुनरागमनांपैकी एक. आता येथून पुढील क्रिकेटच्या वाटचालीत असं पुनरागमन होईल की नाही हे मला माहीत नाही. पण ऋषभ पंतसाठी मी म्हणेन की, तो मैदानात आल्यानंतर यापेक्षा मजबूत, कठीण, मानसिक आणि शारीरिक पुनरागमन होऊ शकत नाही. हे खरंच अप्रतिम आहे, कारण भयानक कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर ६२० दिवसानंतर अशा प्रकारचे पुनरागमन करणे सोपं नाही.”

ऋषभ पंतने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली –

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पुनरागमनानंतर भारत वि बांगलादेशमधील पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले आहे. ऋषभ पंतने रस्ते अपघातानंतर तब्बल ६३३ दिवसांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि पुनरागमनानंतर पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावत त्याने पुनरागमनाचा डंका वाजवला. पंतने १२४ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांसह आपले सहावे कसोटी शतक झळकावले. यासह पंतने धोनीच्या मैदानावरच त्याच्या शतकांची बरोबरी केली.

हेही वाचा – IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

ऋषभ पंतने पुनरागमनाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आणि ज्या शैलीसाठी तो ओळखला जातो त्याच शैलीत तो कसोटी क्रिकेट खेळताना दिसला. त्याने आक्रमक शैलीत फलंदाजी केली. पहिल्या डावात ३९ धावा करून तो बाद झाला असला, तरी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने दमदार शतक झळकावले. तो प्लेअर ऑफ द मॅचचाही दावेदार होता, पण आर अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावून आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत त्याला मागे सोडले. त्यामुळे पंतऐवजी अश्विनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ऋषभ पंत प्रत्येक सामन्यासाठी तयार असतो आणि जास्तीत जास्त सराव करताना दिसतो.

Story img Loader