IND vs BAN Bangladesh Test squad announce against India series :: बांगलादेशने भारत दौऱ्यासाठी आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. भारत दौऱ्यावर बांगलादेश दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर आता बांगलादेश संघाची नजर टीम इंडियाविरुद्धच्या शानदार कामगिरीकडे आहे. त्यामुळेच बांगलादेशने आपल्या संघात एकच मोठा बदल केला आहे. त्याचबरोबर खुनाचा आरोप असलेल्या शकीब अल हसनला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

बांगलादेशने अनकॅप्ड फलंदाज जॅकर अली अनिकचा संघात समावेश केला आहे, तर वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये जॅकर अली अनिक बांगलादेश संघाचा एक भाग होता. जॅकर अली हा यष्टीरक्षक-फलंदाज आहे आणि त्याने बांगलादेशसाठी आतापर्यंत १७ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर २४५ धावा आहेत.

हत्येचा आरोप असणारा खेळाडूला संघात कायम-

सध्या शकीब अल हसन खुनाच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. बांगलादेशने यापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती, त्यादरम्यान शकीबवर हत्येचा आरोप करण्याला आला होता. आता या आरोपांदरम्यान, भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शकीब संघात कायम आहे. हत्येच्या आरोपांमुळे बांगलादेश बोर्ड शकीब अल हसनला भारत दौऱ्यासाठी संघाचा भाग बनवणार नसल्याचा अंदाज बांधला जात होता, परंतु तसे झाले नाही आणि त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – ४,४,६,६,६,४…ट्रॅव्हिस हेडकडून सॅम करनची धुलाई! एकाच षटकात कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा, VIDEO व्हायरल

भारताने शेवटचे २०१९-२० मध्ये बांगलादेशचे यजमानपद भूषवले होते. या कसोटी मालिकेत टीम इंडियाने बांगलादेशचा २-० असा पराभव केला. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघ ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत आमनेसामने येतील.

हेही वाचा – ४,४,६,६,६,४…ट्रॅव्हिस हेडकडून सॅम करनची धुलाई! एकाच षटकात कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा, VIDEO व्हायरल

भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ २०२४: नजमुल शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी मिराज, जॅकर अली अनिक, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद

हेही वाचा – Kieron Pollard : रिटायरमेंट मागे घेऊन पोलार्ड मुंबई इंडियन्सकरता IPL 2025 मध्ये खेळताना दिसणार?

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.